शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत रखडल्या सभापतींच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:04 IST

महापालिकेच्या विषय समित्या निवडल्या खºया मात्र या समित्यांचे सभापती निवडण्यास विलंब लावला जात असल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेच्या विषय समित्या निवडल्या खºया मात्र या समित्यांचे सभापती निवडण्यास विलंब लावला जात असल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे.महापालिकेचा कारभार चालविताना विविध विभागांमध्ये प्राधान्याने कामकाज व्हावे आणि या विभागातील समस्या सभागृहापुढे याव्यात या उद्देशाने विषय समित्या गठीत केल्या जातात. त्या त्या विभागातील समस्यांवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी विषय समित्यांच्या सभापतींचीही निवड होते. त्यामुळे मनपाच्या इतर पदाधिकाºयांबरोबरच विषय समित्यांनाही महत्त्व प्राप्त होते. मात्र परभणीत विषय समित्यांच्या सभापतींच्याच निवडी रखडल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे सभापती पदासाठी इच्छुक असणाºया नगरसेवकांची उत्सूकता ताणली जात आहे. शिवाय विकासकामांनाही गती मिळत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल २०१७ मध्ये महापालिकेचा कारभार नवीन पदाधिकाºयांच्या हाती आला. त्यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर मनपाच्या विषय समित्यांची निवड करण्यात आली. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत निवडलेल्या विषय समित्यांवर सर्वच पक्षांच्या सदस्यांना स्थान देण्यात आले. मात्र अजूनही विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाली नाही. महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, बांधकाम, शहर सुधार, न्याय व विधी अशा सात समित्यांचे सात सभापती पदे रिक्त आहेत. सभापतींच्या निवडीसाठी विलंब केला जात असल्याने इच्छुकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. तेव्हा मनपाची सर्वसाधारण सभा तातडीने घेऊन सभापती पदाच्या निवडी कराव्यात, अशी मागणी होत आहे.स्वीकृत सदस्याचे पदही रिक्तमहापालिकेत स्वीकृत सदस्याची पाच पदे असून, त्यापैकी राष्टÑवादी काँग्रेसच्या वाट्याच्या स्वीकृत सदस्याची सर्वप्रथम निवड झाली. डिसेंबर महिन्यात भाजपाचा एक आणि काँग्रेसच्या दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. एका स्वीकृत सदस्याचे पद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्याची निवड करण्यासाठीही तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी होत आहे.