शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

साडेआठ लाख क्विंटल रासायनिक खताचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

गंगाखेड : तालुक्यातील १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ८ लाख ३० क्विंटल रासायनिक खताचा ...

गंगाखेड : तालुक्यातील १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ८ लाख ३० क्विंटल रासायनिक खताचा वापर केला आहे. खरीप हंगामात विक्री झालेल्या रासायनिक खताची नोंद पंचायत समितीच्या कृषी विभागात झाली आहे. एक एकर शेतात सरासरी पाच क्विंटल रासायनिक खताचा वापर झाल्याचे दिसून येत आहे.

गंगाखेड तालुक्यात १ लाख ४५ हजार हेक्टर शेती आहे. यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी ८ लाख ३० हजार क्विंटल खताची खरेदी केली आहे. त्यामुळे यावर्षी सर्वाधिक खताची विक्री झाली आहे, असे दिसून येत आहे. यामध्ये २ लाख ५० हजार क्विंटल युरिया, १ लाख २० हजार क्विंटल डीएपी, ४० हजार क्विंटल एमओपी व इतर ४ लाख ६० हजार असा एकूण ८ लाख ३० हजार क्विंटल खताची शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांसाठी वापरला आहे. दरम्यान, एकीकडे राज्य शासन व सामाजिक संस्था रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे कल द्यावा, असे आवाहन व याबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे गंगाखेड तालुकावासीयांनी एकट्या खरीप हंगामात १ लाख ४५ हजार हेक्टर ८ लाख ३० क्विंटल रासायनिक खताची खरेदी करून एका एकरामध्ये सरासरी पाच क्विंटल रासायनिक खतचा वापर केला आहे. रासायनिक खताच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. त्यामुळे याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे.

पर्यायावरण हानीकारक

गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून रासायनिक खताचा अती वापर होत असल्याने जमिनीचा पोत बिघडून पर्यावरणास हानीकारक ठरत आहे. त्यामुळे सेंद्रिय खताच्या वापरासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक ती जनजागृती करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी चेतन लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

सासस