गंगाखेड : तालुक्यातील मसला गावामध्ये ट्रॅक्टर उलटल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मसला येथील राम जिजाभाऊ शिंदे (वय २५) हा गोदावरी पात्रातून वाळुने भरलेलेट्रॅक्टर घेऊन येत असताना गोदाकाठावरील चढावर ट्रॅक्टर उलटले. यामध्ये राम शिंदे जखमी झाला. उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गंगाखेड पोलिसठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. /(वार्ताहर) |
अपघातात एकठार
By admin | Updated: February 12, 2015 13:48 IST