शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिंतुर ग्रामीण रुग्णालयात औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:34 IST

या रुग्णालयातील अधिकारी गरजूंना औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी नाईलाज असल्याचे सांगत हतबलता दाखवत आहेत.

ठळक मुद्देएकिकडे अ‍ॅलोपॅथी औषधी उपलब्ध नसताना औषधी भांडारात मात्र लाखो रूपयांची आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसेच युनानी औषधी पडून आहे़त

- विजय चोरडिया 

जिंतूर (परभणी ) : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध औषधींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, या रुग्णालयातील अधिकारी गरजूंना औषधी उपलब्ध करून देण्याऐवजी नाईलाज असल्याचे सांगत हतबलता दाखवत आहेत.

जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयात सध्यस्थितीत कफसिरप, आॅक्सीटोसीन, पाम इंजेक्शन, अ‍ॅव्हील, रॅनिटिडीन, आमॉस्प्रिलीन, मेट्रो, सिप्रो, रॅबीज लस आदी औषधी अनेक दिवसांपासून उपलब्ध नाहीत. या रुग्णालयात आलेल्या बहुतांश रुग्णांना पॅरासिटीमॉल किंवा अ‍ॅन्टीबायोटिकच्या दोन गोळ्या किंवा पोटदुखी, अ‍ॅसिडिटीच्या दोन गोळ्या देऊन बोळवण केली जाते. गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध करून दिल्या जात नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांत येथे बोटावर मोजण्या इतकेच सलाईन रुग्णालयात आले आहेत. त्यामुळे अतिसंवेदनशील रुग्णालाच येथे सलाईन लावले जाते. इतर रुग्णांना मात्र खाजगी दुकानातून औषधी व सलाईन आणण्याचा सल्ला येथील डॉक्टर देत आहेत.

विशेष म्हणजे गरजू रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध न झाल्यास खाजगी दुकानातून ती खरेदी करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून मिळत असतो. वर्षभरात याअंतर्गत आलेल्या निधीतून औषधी खरेदी झाली की, नाही,  याबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच मानव विकास मिशन यंत्रणेमार्फत वेगवेगळी शिबिरे घेण्यासाठी, कुटूंबकल्याण कार्यक्रमासाठी लाखोचा निधी उपलब्ध करून दिला जातो़ या निधी खर्चाची चौकशी होणे गरजेचे आहे़ तसेच ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून एक्सरे मशीन आणण्यात आली आहे. मात्र एक्सरे फिल्म नसल्याने पंधरा ते वीस दिवसांपासून या रूमला कुलूप आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी सेवा घ्यावी लागते.

आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टर देतात अ‍ॅलियोपॅथीची औषधी

एकिकडे ग्रामीण रुग्णालयाची अशी अवस्था असताना ट्रॉमाकेअरमध्येही फारशी समाधानकारक स्थिती नाही. येथे अर्थोपिडीक तज्ज्ञ नाही. भूलतज्ज्ञ आहे; परंतु, ते नियमित रुग्णांची तपासणी करतात. बालरोग तज्ज्ञही अपघात विभागात सेवा देतात. त्यामुळे नेमके ट्रॉमाकेअर काढले तरी कशाला, असा प्रश्न निर्माण होत आहे. अपघातातील जखमी रुग्णांवर मलमपट्टी करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला पाठविले जाते. याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिंधीचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच प्रयोगशाळेतही शुगर कीट आदी तपासणीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नाही.

रूग्णालयात अस्वच्छतेचा कळसग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठला आहे़ बाथरुम व शौचालयात प्रचंड घाण असून रुग्ण वार्डामधील बेड अस्वच्छ आहेत. बेडवर फाटलेल्या गाद्या असून, त्यावर धूळ साचली आहे़ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, प्रसुती वार्डातही मोठी दुर्गंधी पसरत आहे़ या इमारत परिसरात डुकरांचा मुक्त संचार असल्याने रुग्णांना जीव मुठीत धरून दवाखाना करावा लागत आहे़ तसेच इमारतीच्या चोहीबाजूच्या खिडक्याची तावदाने तुटलेली आहेत़ तुटलेल्या तावदानाला पुठ्ठे व पत्रे बसविलेले आहेत़ शौचालयाची स्वच्छता केली नसल्याने प्रचंड दुर्गंधी येते़ परिसराला लागून असलेल्या शवविच्छेदन गृह परिसरातील निवाऱ्याचाही भलत्याचा कामासाठी वापर होत आहे़

अ‍ॅलोपॅथी, युनानी औषधी पडून एकिकडे अ‍ॅलोपॅथी औषधी उपलब्ध नसताना औषधी भांडारात मात्र लाखो रूपयांची आयुर्वेदिक, होमिओपॅथी तसेच युनानी औषधी पडून आहे़ विशेष म्हणजे, या औषधीची मुदत संपत चालली आहे़ या औषधींवर धूळ साचली आहे़ औषधी उपलब्ध असताना आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी डॉक्टर अ‍ॅलोपॅथीची औषधी देत आहेत़ त्यामुळे रूग्णांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधंparabhaniपरभणी