शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माझे धोतर फेडण्याची भाषा करू नका, तुमची पँट फेडेन; रत्नाकर गुटेंनी खासदारांना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:44 IST

परभणीत आमदार रत्नाकर गुट्टेंनी पुन्हा खासदार संजय जाधव यांना डिवचले

गंगाखेड : माझे धोतर फेडून दाखवा, अन्यथा तुमची पँट काढून नाही पाठवली, तर नावाचा आमदार रत्नाकर गुट्टे नाही, असे वक्तव्य गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खासदार संजय जाधव यांच्या निवडणुकीदरम्यानच्या वक्तव्याचा समाचार घेताना केले. गुरुवारी रात्री तालुक्यातील माखणी येथील सत्कार समारंभात आ. गुट्टे यांनी पुन्हा खासदारांना डिवचले आहे.

यावेळी गुट्टे म्हणाले की, निवडणूक प्रचारात मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर बोलत होतो. मात्र, खासदार संजय जाधव हे निवडणुकीत माझे व माझ्या कार्यकर्त्यांचे धोतर फेडण्याची भाषा करत होते. यानिमित्ताने मी खुले चॅलेंज देतो की, त्यांनी माझे धोतर फेडून दाखवावे अन्यथा मी तुमची पँट काढून नाही दाखवली, तर आमदार रत्नाकर गुट्टे नाव सांगणार नाही. जाधव यांनी आता जिल्ह्यातील उबाठा गट सांभाळण्याची क्षमता ठेवावी. मी परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांचे जाळे उखडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच दिला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारात जाधव यांनी गुट्टे यांच्यावर वेळोवेळी टोकाची व जहरी टीका केली होती. निवडणुकीत न बोलणारे गुट्टे जिंकल्यानंतर खासदारांवर तोंडसुख घेत आहेत. खासदारांचीच रणनीती त्यांच्यावर वापरली जात आहे. निवडणूक संपली तरीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ही चिखलफेक अशीच सुरू राहण्याची चिन्हे आहेत. तेच ते ऐकून वैतागलेल्या जनतेला मात्र विकासावर बोलण्याची अपेक्षा असून, त्यावरही ही मंडळी बोलणार की असेच तोंडसुख घेत राहणार? असा प्रश्न पडत आहे.

खासदार-आमदारांत जुनेच राजकीय वैरखासदार संजय जाधव व गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे या दोघांत नेहमीच राजकीय आरोप - प्रत्यारोप, तसेच टीकेची जोरदार पार्श्वभूमी राहिलेली आहे. खासदार जाधव यांनी आमदार गुट्टे यांच्याविरोधात गंगाखेड शुगर कारखान्याच्या माध्यमातून मोर्चा काढत टोकाची टीका केलेली आहे. आमदार गुट्टे यांनीही परभणी शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत शहराच्या बकाल अवस्थेवरून खासदारांना छेडले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीSanjay Jadhavसंजय जाधवPoliticsराजकारण