शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात डॉल्बी; हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 15:48 IST

लातूर : लग्नात परवानगीपेक्षा अधिक वेळ डॉल्बी वाजवून दारूगोळ्याची आतषबाजी केल्यामुळे लग्न सोहळ्याच्या संयोजकासह मंगल कार्यालयाच्या मालकावर

लातूर : लग्नात परवानगीपेक्षा अधिक वेळ डॉल्बी वाजवून दारूगोळ्याची आतषबाजी केल्यामुळे लग्न सोहळ्याच्या संयोजकासह मंगल कार्यालयाच्या मालकावर एमआयडीसी पोलिसांच्या तक्रारीनुसार शनिवारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ लातूर शहरातील बड्या हस्तींवर हा खटला दाखल झाल्याने खळबळ उडाली होती़ या खटल्यात जागामालक व लग्नसंयोजकांनी गुन्हा मान्य केल्यानंतर मंगळवारी लातूरच्या न्यायालयाने दोघांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़लातूरच्या बार्शी रोडवरील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर शेखर लक्ष्मीकांत ताथोडे यांच्या मालकीच्या खुल्या जागेतील लॉनवर २१ व २२ एप्रिल रोजी लग्न सोहळ्याचे संयोजक राजकुमार अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी विवाह सोहळा आयोजित केला होता. दरम्यान २२ एप्रिलच्या रात्री १२.३० वाजेपर्यंत वरातीच्या नावाखाली डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज तसेच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलिसांना आदेश दिल्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षक उमाप यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार लग्न सोहळ्याचे संयोजक राजकुमार इंद्राज अग्रवाल (रा. कातपूर रोड, लातूर) आणि विवाह सोहळा जेथे होता तेथील जागा मालक शेखर लक्ष्मीकांत ताथोडे (रा. सावेवाडी, लातूर) या दोघांविरुद्ध भादंवि कलम ३६ (ड)/ १३४ मुंबई पोलिस कायद्यानुसार लातूरच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला़ दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी प्रमीला सगर यांनी मंगळवारी या दोघांना लातूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट सातवे न्या़ के़एम़पत्रे यांनी दोघांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ (प्रतिनिधी)लातुरात पहिल्यांदाच अशा खटल्यातून शिक्षा...४लातूरच्या दोन बड्या हस्तींवर अशा पद्धतीची कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली होती़ लग्नात उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी, मोठा आवाज, वरातीच्या नावाखाली रस्ता अडथळा झाल्याप्रकरणी लातुरात हा पहिल्यांदाच खटला दाखल झाला होता़डॉल्बी वाजविणे व फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी संबंधित लग्न सोहळा संयोजकांनी परवानगी घेतली होती. मात्र वेळेचे उल्लंघन संयोजकांकडून झाले. त्यामुळे हा खटला दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.