सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना तालुक्यात वितरणासाठी पाठविलेल्या मकाचे निकृष्ट दर्जाच्या आहेत. धूळ व काळवट मका घेताना लाभार्थींना सर्दी व खोकला असा त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. या अनुषंगाने ‘लोकमत’ने २० एप्रिल रोजी ‘रेशन लाभार्थांना निकृष्ट मकाचे वाटप’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी सेलू येथील तहसीलदारांना मंगळवारी पत्र पाठवले आहे. त्यात अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थीं ना खराब धान्य वितरित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गुदामात खराब धान्य (मका) प्राप्त झाल्यास अन्नधान्य उचल प्रतिनिधीमार्फत तत्काळ चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत खराब धान्य वितरित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास सर्वस्वी आपली जबाबदारी राहील, असेही या आदेशात मुथा यांनी नमूद केले आहे.
निकृष्ट धान्य वितरित करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST