शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मृदा आरोग्यासाठी व्यापक संशोधन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा - परभणीच्या वतीने ‘बदलत्या हवामानातील अद्यावत शेतीत ...

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा - परभणीच्या वतीने ‘बदलत्या हवामानातील अद्यावत शेतीत मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा नावीण्यपूर्ण दृष्टीकोन’ या विषयावर ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर दरम्‍यान दर रविवारी ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. ६ डिसेंबर रोजी समारोप कार्यक्रम प्रसंगी डॉ.चौधरी बोलत होते. अध्यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्‍थेचे माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी, भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सय्यद इस्माईल, सचिव डॉ. प्रवीण वैद्य आदींची उपस्थिती होती.

डॉ. चौधरी म्हणाले, कृषी संशोधन व विस्तार संबंधित पुस्तकरुपी ज्ञान प्रत्यक्षात शेतक­ऱ्यांच्या बांधावर पोहचण्‍यासाठी प्रभावी विस्तार कार्य आवश्यक आहे. खतांची कार्यक्षमता वाढवून प्रति हेक्टरी रासायनिक खताचा वापर कमी करण्यास वाव असल्‍याचे मत त्‍यांना व्‍यक्‍त केले. डॉ. एस.पी. वाणी म्हणाले, मृद शास्त्रज्ञानी संशोधना बरोबर कृषी विस्तार कार्यामध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक असून कृषी संशोधन व कृषी विस्तार या दोन गोष्टींना प्राध्यान्य देणे गरजेचे आहे. अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले, कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावात आयोजित व्याख्यानमालेमुळे मातीच्या आरोग्‍याबाबत शेतकरी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्‍यांना निश्चितच उपयुक्‍त माहिती मिळाली. शाश्वत शेती क्षेत्रात हवामानावर अधारित स्मार्ट तंत्राचा शेतक­ऱ्यांनी योग्य उपयोग केल्यास उत्पादना वाढ होईल, असे मत व्यक्त केले. डॉ. सय्यद इस्माईल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेचे सचिव डॉ. प्रवीण वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पपिता गौरखेडे यांनी सूत्रसंचालन केले.

या व्याख्यानमालेत देशातील नामांकित संस्थांचे शास्त्रज्ञ डॉ डी.के. पाल, डॉ. एस.पी. वाणी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी. चंद्रशेखरराव, डॉ. सी. श्रीनिवासराव, डॉ. डी.एल.एन. राव, डॉ.दीपक रंजन बिस्वास, डॉ. देबाशीस चक्रवर्ती, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. सुरेशकुमार चौधरी आदींची व्‍याख्‍याने झाली.