शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बोरी येथील अंगणवाडीच्या निधी वितरणावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

जिल्हा नियोजन समितीने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी जि. प. ला अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला होता. त्यानुसार बोरी येथे अंगणवाडीचे ...

जिल्हा नियोजन समितीने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी जि. प. ला अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला होता. त्यानुसार बोरी येथे अंगणवाडीचे बांधकाम करण्यासाठी ५ लाख ९३ हजार १३३ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदरील अंगणवाडीचे बांधकाम न करताच जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी ग्रामपंचायतीमार्फत यासाठीचे पूर्ण बिल उचलून अपहार केल्याचा आरोप भाजपाच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. सत्तेचा गैरवापर करीत हे काम करण्यापूर्वीच १२ फेब्रुवारी रोजी चौधरी यांनी कामाचे बिल उचलले. त्यानुसार सदर अंगणवाडीच्या कामाच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेकडून कामाची ५ लक्ष ९३ हजार १५५ रूपयांची देयके आरटीजीएसद्वारे हस्तांतरित ही करण्यात आली. याबाबत आपण जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संबंधित खाते होल्ड ठेवण्याचे असे लेखी आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच बोरी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही निधीचा अपव्यय न होऊ देणे बाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले असल्याचे आ. बोर्डीकर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौधरी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

पराभवाच्या नैराश्येतून आरोप- चौधरी

जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी बांधकामाचा निधी उचलून खर्च केलेला नाही. पूर्वी ज्या भागात अंगणवाडी मंजूर झाली, त्या भागात जागा मिळत नसल्याने इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून अंगणवाडीचे बांधकाम सध्या सुरू केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवातून नैराश्य आल्याने आ. मेघना बोर्डीकर यांनी हा आरोप केला आहे. सातत्याने अधिकाऱ्यांकडे बसून त्यांना त्रास देण्याऐवजी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून तोच वेळ त्यांनी जनतेच्या सेवेसाठी द्यावा, असे चौधरी म्हणाले.