शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेतन पथक कार्यालयाची बैठक ६ एप्रिल रोजी घेण्यात आली. या बैठकीस वेतन पथक कार्यालयातील अधीक्षक मनोज भातलवंडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी चालू आर्थिक वर्षापासून ३० नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांचे एनपीएस कपात शालार्थ प्रणालीमार्फत करणे, शिक्षकांचे आयकर, ऑनलाइन वेतन देयक सादर करताना येणाऱ्या त्रुटी, भविष्य निर्वाह निधी कपात व पावत्या, १०० टक्के अनुदानित शाळांतील अंशत: अनुदानित तुकड्यांची वेतन देयके आदी मुद्द्यांवर भातलवंडे यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या बैठकीस जिल्ह्यातील १०४ खासगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शेख, मुख्याध्यापक पातळे, मन्मथ कुबडे, अंकुश भंगे आदींनी प्रयत्न केले.
शिक्षण विभागाच्या बैठकीत वेतन देयकांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST