शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या आकडेवारीमध्ये दोन विभागात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

परभणी शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दररोज होणाऱ्या मृत्यूची एकत्रित नोंद आरोग्य विभाग ठेवते. ही नोंद दररोज कोरोनाच्या रुग्णसंदर्भात ...

परभणी शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दररोज होणाऱ्या मृत्यूची एकत्रित नोंद आरोग्य विभाग ठेवते. ही नोंद दररोज कोरोनाच्या रुग्णसंदर्भात काढल्या जाणाऱ्या प्रेस नोटमध्ये दिली जाते. मात्र, मंगळ‌वारी महापालिका पथकाने अंत्यसंस्कार केलेल्या ४ जणांची नोंद आरोग्य विभागाने का घेतली नाही किंवा महापालिकेने केलेल्या अंत्यसंस्काराची माहिती जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाला दिली गेली नाही का, हे मात्र न समजण्यासारखे आहे. मंगळवारी कोरोनाने मयत झालेल्या ४ जणांचे अंत्यसंकार केल्याचे महापालिकेच्या एका सुत्राने स्पष्ट केले.

महापालिकेकडे १२९२ जणांची नोंद

महापालिकेचे मृतांचे अंत्यसंस्कार करणारे पथक शहरात खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयात झालेल्या सर्व बाबींची नोंद ठेवत आहे. मंगळवारपर्यंंत या पथकाने १२९२ जणांचे अंत्यसंस्कार केले आहेत. यासाठी ६४ लाख ६० हजारांचा खर्च महापालिका विभागाने केला आहे. याउलट जिल्हा आरोग्य विभागाकडे १२४९ मृत्यू कोरोनाने झालेल्यांची नोंद मंगळवारपर्यंत आहे. या दोन्ही विभागाच्या आकडेवारीत तब्बल ४३ मृत्यूची तफावत आहे.

आरोग्य विभाग अनभिज्ञ

जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी फोन केल्यावर माहिती देण्यास फारसा प्रतिसाद देत नाहीत. महापालिका स्तरावर होणारे लसीकरण, दररोजच्या कोरोना चाचणी त्यातील शहर महापालिका स्तरावरचे निघणारे पाँझिटिव्ह रुग्ण याची परिपुर्ण माहिती मनपा विभाग ठेवत असला तरी ही माहिती दिली जात नाही. याऊलट आरोग्य विभागाने हे ४३ मृत्यू का दडवले, याची माहितीही अद्याप दिली नाही.

६ जूनला एकही अंत्यसंस्कार पथकाने केला नाही

मागील तीन दिवसांपूर्वी महापालिका अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकाने ६ जूनला एकही मृत्यू नसल्याने अंत्यसंस्कार प्रक्रीया केली नाही. १ ऑगस्ट २०२० नंतर पहिल्यांदाच पथकाला अंत्यसंस्काराच्या जबाबदारीतून एक दिवस विश्रांती मिळाली.