शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

देवला पूनर्वसन येथे स्मशानभूमीचा वाद परत ऐरणीवर; शेवटी वादातील जागेतच केले वृद्धावर अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 18:28 IST

स्मशानभूमीच्या जागेसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करीत असलेल्या देवला पूनर्वसन येथील स्मशानभूमीचा वाद आज परत एकदा ऐरणीवर आला.

ठळक मुद्दे२० जुलै रोजी आश्रोबा पंडूरे या मयतावर संतापलेल्या ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या जागेची मागणी करीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले होते.ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहत वादातील गट नंबर २३५ या जागेवरच वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले व स्मशानभूमीसाठी चालू असलेला संघर्ष त्यांनी कायम ठेवला आहे.

परभणी : स्मशानभूमीच्या जागेसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करीत असलेल्या देवला पूनर्वसन येथील स्मशानभूमीचा वाद आज परत एकदा ऐरणीवर आला. एका वृद्धाच्या अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी आज सकाळी महसूळ प्रशासन व ग्रामस्थांमध्ये खडाजंगी झाली. मात्र , ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहत वादातील गट नंबर २३५ या जागेवरच वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले व स्मशानभूमीसाठी चालू असलेला संघर्ष त्यांनी कायम ठेवला आहे.

निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या सातोना रोडवरील देवला पूनर्वसन येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी या प्रश्नावर लढा सुरू केला होता. २० जुलै रोजी आश्रोबा पंडूरे या मयतावर संतापलेल्या ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या जागेची मागणी करीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे देवला येथील स्मशानभूमीचा राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतरही प्रशासनाने स्मशानभूमीच्या जागेसाठी तत्परता न दाखविल्यामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा संघर्ष शिगेला पोहचला. शुक्रवारी पहाटे देवला पूनर्वसन येथील सुंदर हरिभाऊ शेळके (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करावेत? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी  ुपुन्हा एकदा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निश्चिय केला होता. 

ही माहिती महसूल विभागाला मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तहसीलदार स्वरुप कंकाळ, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी देवला येथे जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच गट नं. २३५, २३६ या जागेची पाहणी केली. ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी पूर्वी असलेली गट नं. २३५ ची जागा मिळावी, अशी अग्रही भूमिका घेतली. मात्र प्रशासनाकडून २३६ मध्ये जागा दिली जाईल, असे सांगण्यात आले. यावर ग्रामस्थ आणि महसूल अधिकारी यांच्यात चांगलीच चर्चा झडली. त्यानंतर या प्रकरणी दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे सहाय्यक जिल्हाधिकारी कर्डिले यांनी ग्रामस्थांना सांगितले. परंतु, शुक्रवारी दुपारी एक वाजेनंतरही निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर गट नं. २३५ मधील संरक्षण भिंत पाडून मयत सुंदर शेळके यांच्या पार्र्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी लालसेनेचे गणपत भिसे, अशोक उफाडे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, गटनेते राम खराबे पाटील, गुलाबराव लाटे, अंकूश मिसाळ, रणजित गजमल, सभापती पुरुषोत्तम पावडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ग्रामस्थ झाले आक्रमकसुंदरराव शेळके यांचा अंत्यविधी कोठे करावा? असा प्रश्न पुन्हा एकदा देवला ग्रामस्थांसमोर उभा राहिला. तहसील कार्यालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत असलेल्या ग्रामस्थांशी महसूल अधिका-यानी गावात जाऊन चर्चा केली. मात्र बारा वर्षापासून हा प्रश्न सुटत नसल्याने महिला व ग्रामस्थांनी महसूल अधिका-यांसमोर आपला संताप व्यक्त केला. गट नं. २३५ मधील जुनीच जागा देण्याची मागणी केली. ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहताच अधिका-यांनी देवला येथून काढता पाय घेतला. अखेर गट नं. २३५ मध्येच शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून ग्रामस्थांनी संघर्ष सुरूच ठेवला.