फळांचे दर (प्रति किलो)
ड्रॅगन फ्रूट १०० रुपये
डाळींब ५० रुपये
सफरचंद १०० रुपये
मोसंबी ५० रुपये
चिकू ४० रुपये
पपई ३० रुपये
पेरू ४० रुपये
आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
शहरात हिमाचल प्रदेश येथून मोठ्या प्रमाणावर सफरचंद येतात. यासह काही सफरचंद काश्मीर येथूनही येतात. यामध्ये मोठे सफरचंद १०० रुपये किलोने विक्री होत आहेत तर सध्या आकाराने लहान असलेले सफरचंद शहरात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत. त्यांचा दर ५० रुपये ते ६० रुपये किलो असा आहे. आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त झाल्याचे दिसून येते.
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
परभणीत ड्रॅगन फ्रूट जपान येथून तसेच चीन येथून येते. तसेच स्थानिक ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी उपलब्ध आहे. जपान व चीन येथून येणाऱ्या एका ड्रॅगन फ्रुटचा दर ४०० ग्रॅमसाठी १०० रुपये एवढा आहे तर स्थानिक ड्रॅगन फ्रूट २०० रुपये किलोने विक्री होत आहे. ड्रॅगन फ्रुटचे भाव मागील काही दिवसांमध्ये ३० ते ४० रुपये एका नगामागे वाढले आहेत.
व्यापारी म्हणतात
सध्या फळांची आवक वाढली आहे. श्रावण महिना व येणारे आगामी सणवार लक्षात घेता फळांचे दर काही प्रमाणात आवक वाढल्याने वाढले आहेत. केवळ ड्रॅगन फ्रुटचे दर वाढले आहेत.
- मो. मुजम्मिल मो. सलिम, परभणी.
नारळ पाण्याचे दर वाढले
आजारी रुग्णांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सध्या याच नारळ पाण्याचा दर एक नारळासाठी ४० ते ५० रुपये असा झाला आहे. नारळ पाण्याचे दर मागील काही दिवसांमध्ये वाढले आहेत.