तालुक्यातील कान्हेगाव येथील ग्रामपंचायत मध्ये खडका- कानेगाव- शिर्शी- शिरोरी हा रस्ता पूर्ण करण्यासाठी ठराव घेण्यात आला आहे. खडका- कानेगाव- शिर्शी- शिरोरी हा रस्ता २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला असून ,जवळजवळ चार वर्षांचा कालावधी झाला तरी सदरील काम पूर्ण झाले नाही. यामुळे कान्हेगाव येथील व परिसरातील सर्व नागरिक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून रुग्णांना बाहेर गावी जाणे अत्यंत कठीण होते. तेव्हा सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी कानेगाव च्या ग्रामपंचायत ठरावाद्वारे करण्यात आली आहे. या ठरावावर सरपंच बेबीसरोज रामेश्वर मोकाशे यांची स्वाक्षरी असून रामेश्वर मोकाशे हे सुचक तर नामदेव दुगाने यांनी अनुमोदन दिले आहे.
खडका ते कानेगाव शिर्शी शिरोरी रस्ता पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST