प्रसाद आर्वीकर /परभणीराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला जिल्ह्यात उतरती कळा लागली असून, तंटामुक्त गावांची संख्या घटत चालली आहे़ २०१६-१७मध्ये योजनेला १० वर्षे पूर्ण होत आहेत़ग्रामीण भागात छोट्या छोट्या कारणावरून होणारे तंटे पोलीस ठाण्यापर्यंत न पोहचता गाव पातळीवरच मिटावेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी करण्यात आली़ पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ त्यापैकी ४ हजार ६८४ प्रकरणांमध्ये समेट घडवून ते गावपातळीवरच मिटविण्यात आले़ गेल्या १० वर्षांतील योजनेचा आढावा घेतला असता आता योजनेला अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे़ २०१०-११ या वर्षांत योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला़ या वर्षामध्ये ४६ गावे पुरस्कार प्राप्त ठरली होती़ त्यानंतर मात्र गावे कमी कमी होत आहेत. २०१२-१३मध्ये ४५ गावांना ‘तंटामुक्त गाव’ पुरस्कार मिळाला़ २०१३-१४मध्ये ३६, २०१४-१५मध्ये २०, २०१५-१६मध्ये अवघ्या चार गावांना तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे़दाखल तंट्यांची संख्याही घटलीतंटामुक्त गाव योजनेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ मागील वर्षी केवळ ५ हजार १६ तंटे दाखल झाले.
तंटामुक्ती योजनेला उतरती कळा
By admin | Updated: May 2, 2017 04:45 IST