शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

कोरडा दुष्काळ जाहीर करावा

By admin | Updated: July 17, 2014 00:25 IST

पूर्णा : राज्यकर्ते हे शेतकऱ्यांची मुले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आजही रडत आहे़

पूर्णा : राज्यकर्ते हे शेतकऱ्यांची मुले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आजही रडत आहे़ सहकारी साखर कारखान्यातून मिळणारे उत्पन्न कोट्यवधींच्या घरात असून, हे कारखाने तोट्यात कसे जातात, असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ़ बाळा नांदगावकर यांनी केली़ गंगाखेड विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा मेळावा १५ जुलै रोजी पूर्णा येथे पार पडला़ या मेळाव्यास आ़ बाळा नांदगावकर, माजी आ़ रोहिदास चव्हाण, मनसे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, बालाजी देसाई, महिला जिल्हाध्यक्ष सुशिला चव्हाण, प्रशांत कापसे, सचिन पाटील, उपसभापती नंदकुमार डाखोरे, दत्ता गायकवाड, धनंजय भेंडेकर आदी उपस्थित होते़ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ़ नांदगावकर म्हणाले, प्रत्येक उमेदवार हे राज ठाकरे आहेत असे समजून संघटनेसाठी एकदिलाने कामाला लागा़ माजी आ़ रोहिदास चव्हाण म्हणाले, राज्यातील जनतेला नवा पर्याय म्हणून मनसे पुढे येत आहे़ जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, बालाजी देसाई यांचीही यावेळी भाषणे झाली़ प्रशांत कापसे यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी पूर्णा तालुकाध्यक्ष राम मोरे, शहराध्यक्ष माऊली कदम, संदीप अळनुरे, चंद्रकांत लोखंडे, सदानंद फड, किशोन देसाई, गणेश कदम, बालाजी डाखोरे, दशरथ काळबांडे, शिवहार सोनटक्के, मयूर दर्गू, राज ठाकर, जगदेव सोनटक्के, त्र्यंबक बोबडे, नामदेव कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मनसेचे शक्ती प्रदर्शनया मेळाव्याच्या निमित्ताने मनसेने पूर्णा शहरात रस्त्यालगत कमानी, झेंडे उभारून आणि झिरो टी पॉर्इंटपासून मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले़