शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा,' जिल्हाधिकारी कार्यालयात टाकली सोयाबीनची करपलेली झाडे

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 4, 2022 19:58 IST

जिल्ह्यात सलग बावीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.

परभणी : जिल्ह्यात सलग बावीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तत्काळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीनची करपलेली झाडे टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला.

परभणी जिल्ह्यात जवळपास पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची पेरणी केली. ही पिके बहरात असताना ऑगस्ट महिन्यापासून सलग बावीस दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगा भरत असतानाच ही उघडीप शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली. पावसाने उघडीप दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करणे गरजेचे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाला याबाबत कोणतेच देणे- घेणे नसल्याचे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीनची करपलेली झाडे टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविला.

त्यानंतर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. यावेळी शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, माधवी घोडके, रामेश्वर जाधव, सय्यद मुस्तफा, ज्ञानेश्वर पंढरकर, नकुल होगे, उद्धव गरुड, माऊली गरुड, सचिन शेरे आदींची उपस्थिती होती.