शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे गडद सावट

By admin | Updated: July 16, 2014 00:18 IST

मो.या.शेख, वस्सा आकाशात होणारी काळ्या ढगांची गर्दी, जोरदार पाऊस पडणार असे वाटत असतानाच सुटणारा जोराचा वारा, ज्यामुळे पळणारी काळी ढगं, लख्ख पडणारं उन्ह आणि पुन्हा पावसाचा चकवा, अस दररोज वातावरण

मो.या.शेख, वस्साआकाशात होणारी काळ्या ढगांची गर्दी, जोरदार पाऊस पडणार असे वाटत असतानाच सुटणारा जोराचा वारा, ज्यामुळे पळणारी काळी ढगं, लख्ख पडणारं उन्ह आणि पुन्हा पावसाचा चकवा, अस दररोज वातावरण ज्यामुळे दिवसागणिक दुष्काळाचे गडद सावट निर्माण होत आहे.अर्धा जुलै महिना संपत आला तरी पावसाचा चकवाच. पावसाच्या चकव्याने जिंतूर तालुक्यातील वस्सा परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे. कोरडीठाक जाणारी नक्षत्र आणि लांबणारी पेरणी यामुळे परिसरावर गडद होत जाणारे दुष्काळाचे सावट यामुळे परिसरातील आर्थिक व्यवहार पूर्णत: मंदावल्याचे चित्र सध्या परिसरात बघावयास मिळत आहे. हतबल झालेल्या बळीराजाचे डोळे आशाळभूत नजरेने पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. धाडस करुन ज्यांनी पावसाच्या काही सरीवर पेरणी केली ते दुबार पेरणीच्या धास्तीने अस्वस्थ झाले आहेत. लांबलेल्या पावसाचा परिणाम परिसरातील आठवडी बाजारावर होत असल्याचे बघावयास मिळत आहे. शनिवारी आडगाव बाजार येथील आठवडी बाजार लोकांविना अर्धवटच राहिला. ग्राहक नसल्याने छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. हॉटेल्सचा व्यवसाय निम्म्याने घटल्याचे अनेकांनी सांगितले. पावसाने कमालीची ओढ दिल्याने परिसरातील लोकांनी जे-जा ही घटली आहे. पावसाने दडी मारल्याने गावाची रयाचं काळवंडली असून भेसूर चित्र दिसू लागले आहे. पावसाने दमदार हजेरी लावावी यासाठी सारेच आपापल्या परीने देवाकडे साकडे करु लागले आहेत.