शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वा रे प्रशासन ! भर उन्हात माळरानावर केले ४२ जणांना क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:39 IST

42 ऊसतोड कामगार लहान मुलांसह भर उन्हात डोंगरावर राहण्यास मजबूर

ठळक मुद्देगावकऱ्यांनी गावात घेण्यास दिला नकार 

जिंतूर : तालुक्यातील वरुड नरसिंह येथे सांगलीहून आलेल्या ऊसतोड कामगारांना गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. यामुळे ४२ ऊसतोड कामगार दोन दिवसापासून कसलाही निवारा नसताना डोंगरावर राहण्यास मजबूर झाले आहेत.

तालुक्यातील वरुड नरसिह  येथील 42 ऊस तोड कामगार सांगली जिल्ह्यातील माढा येथे साखर कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते.  23 एप्रिल रोजी हे सर्व कामगार ट्रॅक्टरद्वारे जिंतूरला आले, प्रशासनाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून वरून  नरसिह येथील शाळेमध्ये क्वारेंटाईन केले. परंतु गाववकर्‍यांनी व  ग्रामसेवक, पोलीस पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष ,सरपंच , तलाठी यांनी शाळेत क्वारंटाईन करण्यास विरोध केला. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारेंटाईन करण्याऐवजी गावाच्या बाहेर दीड  किलोमीटर अंतरावरील डोंगरावर जाण्याचा सल्ला दिला. गावापासून दूर दीड किमी अंतरावर असणाऱ्या डोंगर-माळावर कसलीही सुविधा नसताना नाईलाजाने राहाव लागत आहे.

ना निवारा ना अन्न पाण्याची सोययेथे निवारा,पाणी,वीज,जेवण याची कसलीच व्यवस्था नाही. सावलीसाठी एका झाडाचा आसरा घेत ते दिवस काढतात तर रात्री अंधारात ओसाड माळरानावर झोपातात. तहान लागल्यास बाजुच्या शेतातील जनावरांसाठी साठवलेले शेवाळेयुक्त हौदातील पाणी प्यायचं असे विदारक चित्र आहे. यामुळे महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत. ही देखील माणसं आहेत, याची जाणीव ना प्रशासनाला ना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांना आहे. 

समितीवर कारवाई कराया सर्व प्रकरणाला गावातील सरपंच व ग्रामसेवक ,पोलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त अध्यक्ष, ही कमिटी जवाबदार आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी किमान शासनाने प्रतिनिधी म्हणून सर्व बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असताना असा घाणेरडा प्रकार झाला. या सर्वावर कठोर कारवाई करण्याची मागणी आपत्ती व्यवस्थापन सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता व्ह्हो्उ शकला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी