शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : अहो आश्चर्य ! कोरोना सर्वेक्षणात गैरहजर राहिल्याप्रकरणी मृत प्राध्यापकास कारणे दाखवा नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 17:38 IST

कोरोना काळात तहसील प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर 

गंगाखेड-  कोरोना सर्वक्षणात रूजू न झाल्याने एक वर्षापूर्वी मृत प्राध्यापकासह निवृत्तांना तहसील प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिल्याचे समोर आले आहे. दि.१२ मे या काढण्यात आलेल्या या नोटीस बुधवारी ( दि.१९ ) प्राप्त झाल्या आहेत.मृत आणि निवृत्तांना नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून कोरोना उपयायोजानेबाबत तहसिल कार्यालयास गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा आहे.

नगरपालिकेच्या कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी दि.७ मे रोजी शिक्षक, प्राध्यापक यांना तहसीलदारांनी आदेश दिले होते. यात संत जनाबाई महाविद्यालयातील मृत प्राध्यापक हाश्मी सय्यद रफीक सय्यद तमीज याचे सुद्धा नाव होते. यावर कळस करत या मृत प्राध्यापकालाच सर्वेक्षणात रूजू का झाले नाही म्हणून दि.१२ मे रोजी कारणे दाखवा नोटीस काढली आहे. या नोटीस बुधवारी गैरहजर असलेल्यांना प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीलाच मृत आणि निवृत झालेल्या शिक्षक, प्राध्यापक यांना कोरोना सर्वेक्षणाच्या कामाचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याने हा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. यामध्ये संत जनाबाई महाविद्यालयातील निवृत प्राध्यापक मधुकर घुगे, कल्पना खळीकर, सरस्वती विद्यालयातील निवृत शिक्षक राम पाठक, शाम बाजपेयी यांचा समावेश आहे. यामुळे तहसिल कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त यादीची खात्री केली नसल्याने असे घडले असावे. अशा कामात गटशिक्षण अधिकारी, तहसीलदार यांनी यादी मिळाल्यानंतर मृत, निवृत, काॅरंन्टाईन अशी नोंद करणे आवश्यक आहे. आदेश काढण्यापूर्वी यादीची तपासणी, खात्री करावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत. - सुधीर पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी