शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

Corona virus :लॉकडाऊनमुळे दुग्ध उत्पादक अडचणीत; हजारो लिटर दुध शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 19:55 IST

कोरोनाचा परिणाम दुग्ध व्यवसायावर

ठळक मुद्देजिल्हाबंदीमुळे दूध बाहेर नाही

परभणी : जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, खाद्य पदार्थ बनविणारे स्वीटमार्ट बंद असल्याने त्याचा फटका दूध व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात दुधाची आवक वाढली असून हजारो लिटर दूध शिल्लक रहात आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून परभणीत येणारे दुधाची आवक थांबली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यता दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. परभणी शहरासह प्रमुख मोठे हॉटेल्स आणि चहा बनविणाºया छोट्या हॉटेल्समध्ये दररोज हजारो लिटर दुधाची विक्री होत होती. मात्र आठवडाभरापासून हे हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे हॉटेल्स आणि गोड पदार्थ बनविणा-या स्वीट मार्ट दुकानांसाठी लागणा-या दुधाची विक्री ठप्प झाली आहे.

शिल्लक राहिलेले हे दुध परभणीतील शासकीय मध्यवर्ती दुग्ध शाळेला प्राथमिक सहकारी संस्थेमार्फत दिले जात आहे. त्यामुळे जिल्हा दुग्ध शाळेच्या दूध संकलनात वाढ झाली आहे.सर्वसाधारणपणे जिल्ह्यात दररोज ५ हजार ३७५ लिटर दुधाची आवक होते. मात्र संचारबंदी लागू झाल्याने दुधाची आवक वाढली आहे. २९ मार्च रोजी ११ हजार ५०६ लिटर दुधाचे संकलन झाले आहे. या संकलना व्यतिरिक्तही हजारो लिटर दूध शिल्लक राहिले असून, या दुधाची नासाडी होत असल्याने दूध उत्पादक अडचणीत आले आहेत.

१४० मे. टनाने घटली फळांची आवकजिल्ह्यातील फळे आणि भाजीपाल्यालाही संचारबंदीचा फटका बसला आहे. जिल्हाभरात सर्वसाधारपणे दररोज १६० मे. टन फळांची आवक होते. ही सर्व फळे परजिल्ह्याच्या जिल्ह्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. मात्र वाहतूक आणि मोठ्या बाजारपेठाही बंद असल्याने या फळांची आवक घटली आहे. रविवारी २० मेट्रीक टन फळांची आवक झाली आहे. सुमारे १४० मे. टन फळांची आवक घटल्याने व्यावसायिकांना फटका सहन करावा लागला आहे.फळांप्रमाणेच भाजीपाल्याची आवकही १० मे.टनाने घटली आहे. दररोज ३० मे. टन भाजीपाल्याची आवक होते. मात्र रविवारी केवळ २० मे. टन भाजीपालाच जिल्ह्याच्या बाजारपेठेत दाखल झाला. त्यामुळे कोरोनाचा परिणाम दुध उत्पादकांबरोबरच फळ आणि भाजी विक्रेत्यांनाही बसला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmilkदूधparabhaniपरभणी