शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोना नियम 'स्वाहा'; मृत्यूपश्चात विधीसाठी गंगाखेडमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातून नातेवाईकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 17:33 IST

corona virus : गोदावरी काठावर दशक्रीयाविधीसाठी दि.१५ एप्रिलपासून नगरपालिकेने प्रतिबंध घातलेला आहे.

ठळक मुद्देकाशी, पैठणपाठोपाठ गंगाखेड शहराला धार्मिकदृष्टीने प्राचीन काळापासून विशेष महत्व आहे.

गंगाखेड (परभणी ) :  गोदावरी काठावरील गंगाखेड शहरास प्रतिदक्षीण काशी म्हणून ओळखले जाते. मृत्यूपश्चात करण्यात येणारे विविध विधी, दशक्रीया विधीसाठी महाराष्ट्रासह परराज्यातुन मृतांचे नातेवाईक गंगाखेड येथे येतात. मात्र, कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंर्तगत गोदावरी काठावर दशक्रीयाविधीसाठी दि.१५ एप्रिलपासून नगरपालिकेने प्रतिबंध घातलेला आहे. असे असतानाही कोरोना नियम डावलून महाराष्ट्रासह परराज्यातून येथे दशक्रीया करण्यासाठी मृतांचे नातेवाईक दररोज मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र आहे. बाहेरील नागरिकांची वर्दळ वाढल्याने शहरात कोरोनाच्या भितीचे सावट कायम आहे.

काशी, पैठणपाठोपाठ गंगाखेड शहराला धार्मिकदृष्टीने प्राचीन काळापासून विशेष महत्व आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शहरातील वैष्णव घाट,नृसिह घाटावर होणारे दशक्रीया बंद आहेत. मात्र , काहीजण कोरोना नियम डावलून येथे दशक्रिया विधीसाठी येत आहेत. गोदावरी काठच्या आडवळणाच्या ठिकाणी हे विधी उरकल्या जात आहेत. गोदावरी नदी रेल्वेपूल परीसर, कुबद्याढव, खळी पुलाच्या परिसरात दशक्रीया विधी होत आहेत. यात महाराष्ट्रासह, परराज्यातून नागरिकांची मोठी संख्या आहे. विशेष म्हणजे, बाहेरून आलेले मृतांचे नातेवाईक येथील बाजारपेठेत जात आहेत. यामुळे शहरात कोरोना पसरण्याचा धोका आहे. नियमांची कडक अंमलबजावणी करून येथील विधी बंद करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी