शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उपसा करणाऱ्या ठेकेदारास अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:43 IST

तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी पाणी नेत असलेल्या ठेकेदाराला ११ जानेवारी रोजी येथील ग्रामस्थांनी अडविले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे पाणी गावासाठी आरक्षित करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी पाणी नेत असलेल्या ठेकेदाराला ११ जानेवारी रोजी येथील ग्रामस्थांनी अडविले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे पाणी गावासाठी आरक्षित करण्याची मागणी केली.मानवत तालुक्यातील सोमठाणा गावाजवळ लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना ठेकेदार कंपनीने कामासाठी मुरूमाचे उत्खनन केले होेते. उत्खनन झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जनावरांना पिण्यासाठी हे पाणी आरक्षित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तहसीलदार डी.डी. फुफाटे यांच्याकडे नुकतीच केली होती.ग्रामस्थांनी पाणी आरक्षित करण्याची मागणी केलेली असताना ११ जानेवारी रोजी कालव्याचे काम करणाºया ठेकेदार कंपनीचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी आले होते. ही बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी पाणी असलेल्या ठिकाणी आंदोलन करीत ठेकेदार कंपनीस पाणी नेऊ दिले नाही. यावेळी सरपंच राजाराम कुकडे, ग्रामपंचायत सदस्य रविकांत निर्वळ, माधव निर्वळ, परमेश्वर निर्वळ, बाबासाहेब भदर्गे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे तहसील प्रशासनाने पाणी उपसा न करण्याच्या सूचना दिल्या असून पाणी उपसा थांबविण्यात आला आहे.ग्रामस्थांच्या मागणीकडे तहसीलचे दुर्लक्ष४मानवत तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने पहिल्याच यादीमध्ये मानवत तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश केला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मानवत तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने डिसेंबर महिन्यातच तालुक्याची पाणीपातळी खालावली. परिणामी नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच तालुक्यातील मानवत येथील सोमठाणा येथील मुरूमाने उत्खनन केलेल्या ठिकाणी साचलेले पावसाचे पाणी जनावरांना पिण्यासाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ३ जानेवारी रोजी केली होती.४मागणी करूनही तहसील प्रशासनाने सोमठाणा ग्रा.पं.च्या ठरावाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम करणाºया ठेकेदाराने पाणी उपसण्यास सुरु केली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाणी न उपसण्याच्या तोंडी सूचना संंबंधित ठेकेदाराला तहसीलदारांना द्याव्या लागल्या.पुढील आदेश येईपर्यंत पाणी उपसा न करण्याच्या तोंडी सूचना संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.-डी.डी. फुफाटे,तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीwater transportजलवाहतूक