कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. त्याचा त्यांच्या उपचार पद्धतीवर परिणाम होतो. त्यातून येणारे नैराश्य कधी कधी जीवघेणे ठरते. यासाठी योग्य वेळी आजाराचे निदान, योग्य उपचार, डॉक्टरांच्या सूचनांचे तंतोतंत पालन आणि मनाची खंबीरता असेल तर कोरोनावर मात करता येते, हे अनेक वयोवृद्धांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ८९ वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात ९१ ते १०० वर्ष वयोगटातील ४४ तर १०१ ते १३० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील ५२ वृद्धांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या फक्त ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे कोरोनावर इच्छाशक्तीच्या बळावर मात करता येते, हे या वृद्धांनी दाखवून दिले आहे.
६० ते ७० वयोगटात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात ६० ते ७० वर्ष वयोगटातील सर्वाधिक व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात या वयोगटातील ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय ५० ते ६० वर्ष वयोगटातील ३०७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
७० ते ८० वर्ष वयोगटातील १८२ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.