शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत खड्ड्यात बसून नागरिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:31 IST

तालुक्यातील सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोनपेठ-गंगाखेड रस्त्यावरील भाऊचा तांडा पाटीजवळ १८ डिसेंबर रोजी खड्ड्यात बसून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : तालुक्यातील सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोनपेठ-गंगाखेड रस्त्यावरील भाऊचा तांडा पाटीजवळ १८ डिसेंबर रोजी खड्ड्यात बसून आंदोलन केले.सोनपेठ तालुक्यातील नागरिकांनी दोन वर्षापूर्वी रस्त्याच्या प्रश्नासाठी ५९ दिवस धरणे आंदोलन केले होते. परंतु, त्यावेळसही सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, सर्व रस्ते खड्डेमुक्त करु, असे जाहीर केले होते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे वाटत होते. मात्र १५ डिसेंबरनंतरही सर्वच रस्त्यावर खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याने १८ डिसेंबर रोजी सोनपेठ शहरासह तालुक्यातील वाडी पिंपळगाव, शेळगाव, उक्कडगाव, लोहीग्राम, नरवाडी या सहा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सोनपेठ- गंगाखेड या रस्त्यावर भाऊचा तांडा पाटीजवळ खड्ड्यात बसून आंदोलन केले. या आंदोलनात सुधीर बिंदू, गणेश पाटील, गुलाबराव ढाकणे, माधव जाधव, रामप्रसाद यादव, मारोती रंजवे, अशोक तिरमले, सोमनाथ नागुरे, राधेशाम वर्मा, कृष्णा पिंगळे, सय्यद खदीर, रविंद्र देशमुख, सिद्धेश्वर गिरी, शिवमल्हार वाघे आदींचा सहभाग होता.