शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात नाताळ उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये बुधवारी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन नाताळचा सण म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़ धार्मिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये बुधवारी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन नाताळचा सण म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़ धार्मिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़परभणी शहरात बुधवारी सकाळपासूनच नाताळ सणाची लगबग दिसून आली़ शहरातील विविध चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ सकाळी प्रार्थनेचा कार्यक्रम पार पडला़ यावेळी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत समाजबांधव उत्साहाने सहभागी झाले होते़ शहरातील सरफराज नगर येथील फेथ ए़जी़ चर्चमध्ये नाताळचा सण साजरा करण्यात आला़ फादर डॅनियल एस़ तारु यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले़ प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मानिमित्त आपण एकत्र आलो आहोत़ त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपले जीवन येशू ख्रिस्तांच्या तारणाचा पोशाख परिधान करून त्यांच्या विचारांचे आचरण करून जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले़ शहरातील सरफराज नगर भागातील सीएनआय चर्च, इनायतनगर आणि परसावतनगर येथील चर्च आॅफ द नॅझरीन येथेही नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला़ फेथ ए़जी़ चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या कन्येच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले़ त्यानंतर मुलांनी नृत्य, नाटकांचे सादरीकरण केले़ या कार्यक्रमांना समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम