शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा कचेरीवर चर्मकार समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:11 IST

येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून घोषणाबाजी करीत हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दाखल झाले. तेथे घोषणाबाजी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून घोषणाबाजी करीत हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दाखल झाले. तेथे घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. त्यामध्ये भारतीय संविधानाची प्रत जाळणाºयावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, संबंधित आरोपींना कठोर शासन करावे, संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्व.बाबु जगजीवनराम यांच्या नावाने आयोग स्थापन करावा, संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करावे, महामंडळास नवीन भागभांडवल उपलब्ध करुन द्यावे, महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना बिनव्याजी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा संघटक नरहरी सोनवणे, माधव गायकवाड, प्रकाश गोरे, सुरेश लोकरे, मुंजा शिंदे, इंद्रजीत धोंडगे, महादू शिंदे, बाळासाहेब ठोंबरे, ज्ञानेश्वर आवचार, सुखदेव घोंडगे, बाबासाहेब वानखेडे, रामकिशन कांबळे, प्रल्हाद हाळंबे, बाबाराव वानखेडे, दत्ता शिंदे, गंगाधर शिंदे, अंकुश जोगदंड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीMorchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी