शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बीडीओंच्या खुर्चीला चपलांचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:14 IST

विकास कामांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर टाकण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी गटविकास अधिकाºयांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंचांना गटविकास अधिकाºयांनी प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त होवून तालुक्यातील सरपंचांनी गटविकास अधिकाºयांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून गटविकास अधिकाºयांची बदली करावी, अशी मागणी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विकास कामांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर टाकण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी गटविकास अधिकाºयांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंचांना गटविकास अधिकाºयांनी प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त होवून तालुक्यातील सरपंचांनी गटविकास अधिकाºयांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून गटविकास अधिकाºयांची बदली करावी, अशी मागणी केली़परभणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करखडेलकर यांच्याकडे आहे़ विकास कामे हेतुपुरस्सर रोखून धरणे आणि १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना देण्यास करखडेलकर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तालुक्यातील सरपंचांनी केला़ या संदर्भात बुधवारी तालुक्यातील सरपंचांचे शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकाºयांना भेटण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले़मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दौºयावर असल्याने याच ठिकाणी करडखेलकर यींची त्यांच्या कक्षात सरपंचांनी भेट घेतली़ यावेळी चर्चा करीत असतानाच करडखेलकर हे कक्षातून बाहेर पडले आणि कोणताही तोडगा निघाला नाही़सरपंचांनी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रश्न मांडला़ राठोड यांनी करडखेलकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मी पंचायत समितीतील कक्षात असल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे सरपंचांचे शिष्टमंडळ पंचायत समितीत आले़ परंतु, या ठिकाणीही करडखेलकर उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या सरपंचांनी करडखेलकर यांच्या रिकाम्या खुर्चीला चपलांचा हार घालून आपल्या भावना व्यक्त केल्या़गटविकास अधिकारी करडखेलकर हे विकास कामे हेतुपुरस्सर रखडून ठेवत आहेत़ १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत विकास कामांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो़ मात्र माझ्या परवानगीशिवाय हा निधी देऊ नये, असे पत्र करडखेलकर यांनी बँकांना दिले आहे़ शासन ग्रामपंचायतींना निधी देत असताना कोणत्या नियमांच्या आधारे करडखेलकर यांनी हे पत्र दिले, असा सवाल सरपंच संघटनेने सीईआेंंना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे़ तसेच करडखेलकर यांची बदली करण्याची मागणीही करण्यात आली आहे़ निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष ऐश्वर्य वरपूडकर, रसिका किशोर ढगे, भारत आव्हाड, मीरा जाधव, गोविंद ढोले, कौशल्य आवकाळे, कृष्णा गरुड, शुभांगी मोरे आदींची नावे आहेत़