शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यासाठी कोरोनाचे सेंट्रलाईज्ड केंद्र; आयटीआयमध्ये १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:54 IST

रुग्ण नसलेले केंद्र बंद करण्याचे धोरण प्रशासनाने आता स्वीकारले असून, जिल्ह्याच्या ठिकाणी एकच सर्व सुविधांनीयुक्त केंद्र निर्माण केले जाणार आहे.

ठळक मुद्देआयटीआय येथील केंद्र अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परभणी : येथील आयटीआयला कोरोनाचे सेंट्रलाईज्ड केंद्र करण्याचा प्रयत्न होत असून, त्यादृष्टीने जिल्हाभरातील सुमारे १०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व सुविधांनी हे केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णालयात रुग्णांअभावी जवळपास सर्व बेड रिक्त आहेत. नवीन बाधित रुग्णांची संख्याही आटोक्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण नसलेले केंद्र बंद करण्याचे धोरण प्रशासनाने आता स्वीकारले असून, जिल्ह्याच्या ठिकाणी एकच सर्व सुविधांनीयुक्त केंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी सर्व ती तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील कोविड केअर केंद्र बंद करण्यात आले आहेत. तसेच आयटीआय येथील केंद्र अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या केंद्रात १०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संशयित कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीपासून ते अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारापर्यंतच्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी आय.टी.आय.ची इमारत सेंट्रलाईज्ड केंद्र म्हणून विकसित होत आहे.

आयटीआय केंद्रात मिळणाऱ्या सुविधाआयटीआय येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये आता जिल्हा कोरोना रुग्णालय, डेडीकेटेड कोरोना केअर हॉस्पिटल, कोरोना केअर सेंटर, कोविड ओपीडी, पोस्ट कोविड ओपीडी, फिजिओथेरपी, मानसिक आरोग्य केंद्र, होम आयसोलेशन आणि सारी वार्ड आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णांसाठी भोजन व्यवस्था आणि सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. या ठिकाणी ८ पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

रुग्णांचे मानसिक पाठबळ वाढवाकोरोना हा इतर आजारासारखाच सर्वसाधारण आजार आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक पाठबळ द्यावे. 3त्यांना वेगळी वागणूक देऊ नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी