संभाजी सेनेच्या वतीने खंडोबा बाजार येथील कार्यालयाजवळ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नंदू पाटील आवचार, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुभाष जावळे, युवा सेना शहरप्रमुख बाळराजे तळेकर, प्रशास ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख, मराठवडा उपाध्यक्ष गजानन लव्हाळे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, जिल्हा संघटक विजय जाधव, तालुकाध्यक्ष दौलत शिंदे, विशाल आर्वीकर, विशाल कळसाईतकर, पप्पू रणवीर, उमेश शिंदे, पवन कुरील आदींची उपस्थिती होती. कोरोनामुळे साध्या पद्धतीने प्रशासनाचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST