शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीमंडळाचा निर्णय: परभणीत पहिल्या महिला सूतगिरणीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:20 IST

सहकार तत्वावरील मराठवाड्यातील पहिल्या महिला सूतगिरणीस राज्याच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असून या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: सहकार तत्वावरील मराठवाड्यातील पहिल्या महिला सूतगिरणीस राज्याच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असून या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.परभणी येथील शिवसेनेचे आ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी- पूर्णा तालुक्याच्या हद्दीवरील ैएरंडेश्वर- नांदगाव शिवारात मराठवाड्यातील पहिली सहकार तत्वावरील जय भवानी महिला सूतगिरणी स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. याबाबत १ कोटी ४० लाख रुपयांचे भागभांडवल जमा करुन सर्व कागदपत्रे शासनाला सादर करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आ.डॉ.राहुल पाटील यांनी इचलकरंजी, गुजरातमधील सुरत या शिवाय अन्य शहरांना भेटी देऊन तेथील सुतगिरण्यांच्या कामकाजाची माहिती घेतली होती. त्यानंतरच ही सूतगिरणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील प्रस्तावांना मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता जय भवानी महिला सुतगिरणी उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुतगिरणीची १२ व्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यासाठी निवडही झाली आहे. या सुतगिरणीमध्ये २५ हजार चरक्यांच्या माध्यमातून व अत्याधुनिक यंत्र सामूग्रीद्वारे सूत तयार केले जाणार आहे. हे सूत इतर ठिकाणी निर्यात करुन परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा सूतगिरणी संचालक मंडळाचा मानस आहे.परभणी तालुक्यात यापूर्वी एक सूतगिरणी होती; परंतु, ती बंद पडल्याने तालुक्यातील नव्या सूतगिरणी मंजुरीस अडचण निर्माण झाली. त्यामुळे परभणी- पूर्णा तालुक्याच्या सिमेवर नवी सुतगिरणी स्थापन करावी लागली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाministerमंत्री