मानवत शहरातील बुद्ध नगरातील रहिवासी सारीपुत रावण धबडगे (३७), राहुल अंभोरे (२८), दत्ता गायकवाड (४५) हे तिघे नळ फिटिंगच्या कामासाठी पाथरी येथे गेले होते. दिवसभर काम आटपून सायंकाळी ६:३० वाजता आपल्या दुचाकीवरून परत मानवतकडे येत होते. दुचाकी रत्नापूरजवळ असलेल्या पुलाजवळ आली असता पूला शेजारुन आलेल्या पांदण रस्त्यातून अचानक बैलगाडी समोर आली. काही कळण्याच्या आतच दुचाकी बैलगाडीवर जाऊन आदळली. या अपघातात तिघे जखमी झाले. तिघांनाही शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले असता सारीपुत रावण धबडगे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर राहुल अंभोरे आणि दत्ता गायकवाड यांना परभणी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती मिळाली.
बैलगाडी- दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST