शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘वोट फॉर नेशन’ जनजागृतीसाठी बूलेटस्वारी; सात दिवसात ४ हजार किलोमीटरचा राज्यात प्रवास

By राजन मगरुळकर | Updated: January 13, 2024 18:42 IST

अभियंत्याचा आजपर्यंत सामाजिक अभियान राबविण्यासाठी एक लाख ३० हजार किलोमीटरचा बुलेट प्रवास

परभणी : ‘वोट फॉर नेशन’ अभियानानिमित्त जनजागृती करण्यास परभणीतील शैलेश कुलकर्णी यांनी राज्यभरात बूलेटस्वारी केली. यात त्यांनी अवघ्या सात दिवसात चार हजार २५२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तसेच विविध ठिकाणी भेटी देत संपर्क साधून नवयूवक मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती केली. याच त्यांच्या कार्याची, विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉडसने घेतली आहे. नुकतेच त्यांना याचे मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले.

शैलेश शेषराव कुलकर्णी हे अभियंता असून ते परभणीचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडिल हे पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा लॉयन्स प्रिन्स क्लब यांच्या सहकार्याने शैलेश यांनी ही मोहिम राबविली. अभियानांतर्गत १८ वर्षापुढील मुलांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून येणाऱ्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजवावा यासाठी केलेल्या मोहिमेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. भारत सरकारद्वारे ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानासाठी २३ हजार किलोमीटर, ३४ राज्यांची संपूर्ण भारत यात्रा बुलेटद्वारे करण्यासाठी एकमेव त्यांची मराठवाड्यातून निवड झाली होती. बूलेटस्वारी अभियानांतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांची यात्रा कुलकर्णी यांनी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी परभणीतून सुरु केली होती. ही वारी २२ नोव्हेंबर रोजी म्हणजे सात दिवसात संपवून हा विश्वविक्रम स्थापित केला. यासाठी शैलेश कुलकर्णी यांना आई, वडील एस.एम.कुलकर्णी, सासू-सासरे किशोर जोशी, पत्नी अपर्णा कुलकर्णी यांचे सहकार्य केले.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दखलफास्टेस्ट नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा यांच्याही विश्वविक्रमाची नोंद आहे. से नो टू सिंगल यूज प्लास्टिक या शासकीय अभियानाला राबविण्यासाठी त्यांनी नेपाळ, भूटान अशा दोन देशांची बुलेट राईड केली. भारतीय सेना सन्मान यात्रा अभियान काश्मिर ते कन्याकुमारी तसेच लोंगेवाला पाकिस्तान बॉर्डर व रन ऑफ कच येथे पाकिस्तान बॉर्डर पर्यंतचा प्रवास त्यांनी एकट्याने बुलेटवर केला. आजपर्यंत एक लाख ३० हजार किलोमीटरचा एकूण प्रवास सामाजिक अभियान राबविण्यासाठी त्यांनी बुलेटवरुन केला आहे.

टॅग्स :Votingमतदानparabhaniपरभणी