शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:24 IST

‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्‍वला गॅस योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. ...

‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्‍वला गॅस योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलीकडे वळविला आहे. त्यामुळे शासनाची ही योजना कागदावर राहिली आहे.

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

सारखं गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे गॅस वापरणे आता परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने पुन्हा एकदा चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.

- कांता विठ्ठल अंभोरे, नांदगाव

पूर्वी गॅस सिलिंडर घेतल्यानंतर सबसिडी मिळत होती. आता तीही मिळत नाही. शिवाय किंमत वाढल्याने गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही.

- सीमाबाई काळे, पिंपरी

सरकार नावालाच योजना सुरू करते. त्यांना जनतेशी काहीही घेणे-देणे नाही. त्यामुळेच योजनेच्या नावाखाली गरिबांची थट्टा चालवली आहे. याबद्दल संताप वाटतो.

- लक्ष्मीबाई मस्के, वडगाव