शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

पुल गेला पाण्याखाली; गर्भवती महिलेने केला तराफ्यावरून थरारक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 13:09 IST

Rain In Parabhani : तासाभराच्या प्रवासानंतर रुग्णालयात पोहचलेल्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म 

ठळक मुद्देपूल पाण्याखाली गेल्याने वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी ग्रामस्थांची धडपड परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील टाकळी निलवर्ण येथील घटना 

- सत्यशील धबडगेमानवत ( परभणी ) : जोरदार पावसाने दूधना प्रकल्प पूर्ण भरल्याने नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे दूधना काठावरील टाकळी नीलवर्ण गावात जाणाऱ्या पुलावरून पंधरा ते वीस फूट पाणी आले आहे. दरम्यान, गावातील एका महिलेला प्रस्तुती कळा आल्याने रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी धोका पत्करत तराफ्यावरून नदी पार करण्याचा निर्णय घेतला. तराफ्यावरून तब्बल तासाभर पुरातून थरारक प्रवास करत महिला परभणी येथील रुग्णालयात सुखरूप पोहोचली. ही घटना बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. ( A pregnant woman made a thrilling journey on a raft ) 

तालुक्यातील नऊ गावाला लागून दुधना नदीचे पात्र आहे. जोरदार पाऊस झाल्याने दुधना प्रकल्प तुडुंब भरला आहे. धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुधना काठावर असलेल्या टाकाळी नीलवर्ण गावात जाणाऱ्या पुलावरून १५ फुटापर्यंत पाणी वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील माणिक कुटारे यांची कन्या शिवकन्या अंगद लिंबोरे गर्भावती असल्याने आठवडाभरापूर्वी माहेरी आली होती. बुधवारी सकाळी ८ वाजता शिवकन्याला प्रसूतीकळा सुरु झाल्या. पुरामुळे रस्ताबंद असल्याने तिला रुग्णालयात नेयचे कसे हा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा राहिला. शेवटी थर्माकोलच्या तराफ्यावरून नदी पार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाऊ विठ्ठल वाटोरेने तराफा चालवत तर आणखी दोन भाऊ राहुल कुटारे आणि रमेश कुटारे यांनी पोहत तराफा नदीपार नेला. तराफ्यावर संगीता घटे आणि शारदा कुटारे या शिवाकन्याला होडीवर पकडून बसल्या होत्या. पुराचा प्रवाह वेगवान असल्याने कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकत होता. एक तासाच्या कठिण परिश्रमानंतर शिवकन्या परभणीच्या शासकीय रुग्णालयात प्रस्तुतीसाठी दाखल झाली. दुपारी १. २० मिनिटाला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती सरपंच मयूर देशमुख यांनी दिली..

बहिण आणि बाळ सुखरूप बहिणीला मोठ्याप्रमाणावर वेदना होत होत्या. तिला तत्काळ रुग्णालयात नेणे आवश्यक असल्याने सारासार विचार करून तराफ्यावरून नदी पार करण्याचा निर्णय घेतला. तासाभराने रुग्णालय गाठले. प्रवास धोकादायक होता मात्र बहिण आणि बाळ सुखरूप असल्याने सर्व अडचणीचा विसर पडला आहे.- विठ्ठल वाटुरे (भाऊ )

हेही वाचा - - स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स- ‘येलदरी’ धरण १०० टक्के भरले; चार दरवाजे उघडून विसर्ग 

टॅग्स :floodपूरparabhaniपरभणीpregnant womanगर्भवती महिला