शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST

परभणी शहरात शहर वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करते तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाचे पथकही वाहनधारकांवर कारवाई ...

परभणी शहरात शहर वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करते तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाचे पथकही वाहनधारकांवर कारवाई करत असते. यामध्ये दोनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमाचे भंग केल्यास केवळ दंड भरून घेतला जातो असे नाही तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यास सदरील वाहनधारकांचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे निलंबनासाठी पाठविला जातो.

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन

दारू पिऊन वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर चारचाकी वाहनात न करणे, हेल्मेटचा वापर न करणे, एखाद्याच्या अपघातास कारणीभूत ठरणे, नेहमीच वाहतूक नियमांचा भंग करणे अशा बाबी करणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध लायसन्स निलंबन करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पाठविला जातो. यानंतर त्यावर कारवाई होते.

आधी तीन महिने नंतर कायमस्वरूपी

एखाद्या वाहनधारकांनी सलग दोनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमाचा भंग केल्यास सदरील वाहनधारकांना त्याची लेखी बाजू मांडण्यासाठी संधी दिली जाते. यानंतर आवश्यकता वाटल्यास आधी ३ ते ६ महिन्यांसाठी लायसन्सचे निलंबन केले जाते. यानंतर कायमस्वरूपी निलंबनाचा विचार केला जातो. परंतू, परभणीत अद्यापपर्यंत कोणाचेही कायमस्वरूपी लायसन्स निलंबन केलेले नाही.

अशी होते कारवाई

देशातील वेगवेगळ्या भागांतून विविध राज्यांचे पत्र उपप्रादेशिक परिवहन विभागाला येतात. यात ज्यांनी वाहतुकीचे नियम मोडले आहे, अशांच्या निलंबनासाठी पत्र पाठविले जाते. शहर वाहतूक शाखा दर महिन्याला ही यादी तयार करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविते. यानंतर यातील काही जणांचा निलंबनाचा प्रस्ताव तयार केला जातो.

वर्षभरात दीडशे जणांचे लायसन्स निलंबन

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आलेल्या प्रस्तावावर रीतसर बाजू वाहनधारकांनी मांडल्यानंतर लायसन्स निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव केला जातो. वर्षभरात जवळपास १०० ते १५० जणांचे लायसन्स रद्द केले जाते.

या वर्षातील कारवाई

२०२०-२१ १५०