जिंतूर (जि. परभणी) : दोन बैलांमध्ये झालेल्या झुंजीत तलावात पडलेल्या बैलाला वाचविण्यासाठी गेलेले माणिक तुकाराम मस्के यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे सोमवारी घडली. मस्के यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास सापडला.जोगवाडा (ता. जिंतूर) गावातील तलावाजवळ सोमवारी दोन वळूंची टक्कर लागली होती. त्यातील एक वळू पाण्यात पडल्याचे शेताकडे चाललेल्या माणिक तुकाराम मस्के(४४) यांनी पाहिले. त्याला वाचविण्यासाठी मस्के तलावात उतरले. परंतु, बैलाने हिसडा दिल्याने ते पाण्यात बुडाले. मंगळवारी दुपारी दीड वाजता हुकाला त्यांचा मृतदेह अडकला. (वार्ताहर)
बुडालेल्याचा मृतदेह सापडला
By admin | Updated: November 16, 2016 06:31 IST