शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी लागल्याच्या आनंदावर विरजण; नवनियुक्त तलाठ्यांना पाच महिन्यापासून मिळेना वेतन

By मारोती जुंबडे | Updated: August 29, 2024 18:46 IST

आई जेवायला देईना अन् बाप भीक मागू देईना; नवनियुक्त तलाठ्यांचे तहसीलदारांना साकडे

परभणी: नव्याने नियुक्त झालेल्या  तलाठ्यांचे पाच महिन्यापासून वेतन रखडले आहे. त्यामुळे नोकरी लागल्याच्या आनंदावर प्रशासनाच्या कारभाराने विरजण पडले आहे. परिणामी, तलाठ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गुरुवारी या तलाठ्यानी तहसील कार्यालय गाठून साहेब, पाच महिन्यापासून वेतन नाही, किमान जगण्यासाठी तुम्ही राशन देता का? असा सवाल केला आहे.

ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व नागरिक यांच्यात दुव्याचे काम करणे, यासह आता नव्याने सुरू झालेली लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजनेचेही काम तलाठ्यांकडून सुरू आहे. परभणी तालुक्यात कार्यरत असलेल्या तलाठ्यांना कामाचा भार कमी व्हावा, यासाठी मार्च २०२४ मध्ये परभणी तालुक्यासाठी १३ तलाठ्यांना नियुक्ती देण्यात आली. या तलाठ्यांचे नियुक्तीपासून आपल्या सज्याच्या ठिकाणी काम सुरू आहे. परंतु, प्रशासनाच्या केवळ दुर्लक्षामुळे नियुक्ती पासून त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाच महिन्यापासून हे तलाठी पगाराविना काम करत आहेत. सध्या त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर प्रशासनाने काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, यासाठी गुरुवारी तलाठी संघटनेने थेट तहसील कार्यालय गाठले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देत तलाठ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.  साहेब, पाच महिन्यापासून वेतन नाही, किमान जगण्यासाठी तुम्ही राशन देता का? असा सवाल केला. निवेदनावर  तालुकाध्यक्ष बालाजी बिडकर, सरचिटणीस शिवाजी मोरे, पी. एल. पाटील, किरण चव्हाण, डी.पी. सोनुने, बि. डी. भोसले, एस. बी. शिंदे, पी. एस. पेंडलवार आदींच्या स्वाक्षऱ्यात आहेत.

आई जेवायला देईना अन् बाप भीक मागू देईनापाच महिन्यापासून वेतन रखडलेले तलाठी हे नव्यानेच रुजू झाले आहेत. नोकरी लागण्यापूर्वी अभ्यास करतांना घराच्या बाहेर राहून शिकावे लागले. त्यावेळी रूम, मेस, क्लासेस याचा खर्च आपल्या आईवडिलांकडून घ्यावा लागला.  आता आपल्या मुलाला नौकरी लागली म्हणून आई -वडील आनंदी झाले. परंतु या आनंदावर विरजण पडले. नोकरी लागून पाच महिने झाले तरी अजून पगार नाही. त्यामुळे नोकरी लागूनही घरच्याकडूनच खर्चासाठी पैसे घ्यावे लागत आहेत. आई जेवायला देईना अन् बाप भिक मागू देईना अशी काहीशी अवस्था नवनियुक्त तलाठ्यांची झाल्याचे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग