येथील साने गुरुजी वाचनालयात रविवारी आयोजित मासिक व्याख्यानमालेत भिल्ल आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य समरात योगदान या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा कुलकर्णी या होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, परकीय ब्रिटिश राजवटीने भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. त्यामुळे येथील जनमानस प्रक्षुब्ध झाले होते. रामोशी, भिल्ल, बेरड आदिवासींना हे सहन न झाल्याने त्यांनी ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी ठिकठिकाणी सशस्त्र उठाव केले. त्यांच्याकडे साधनांची कमतरता असतानाही अत्यंत हिमतीने त्यांनी ताकदवान अशा ब्रिटिश लष्करी सैन्यासमोर लढा दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे या लढ्यात आदिवासी महिलांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. उमाजी नाईक, कझसिंग नाईक, तंट्या भिल्ल यांची नावे घेतल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या उपस्थितीत या कार्याक्रमाचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार विलास मिटकरी यांनी मानले.
आदिवासींच्या लढ्यातून स्वातंत्र्यलढ्याची बीजे रोवली गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST