शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

प्रस्ताव नसतानाही लाभार्थ्यांना वाटली खिरापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने २०१६-१७ या वर्षात उपकर योजनेंतर्गत मागासवर्गीयांना पिकोफॉल मशीन पुरवठा करण्याची योजना राबविण्यात आली होती. ...

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने २०१६-१७ या वर्षात उपकर योजनेंतर्गत मागासवर्गीयांना पिकोफॉल मशीन पुरवठा करण्याची योजना राबविण्यात आली होती. यासाठी ३३ लाख ९९ हजार ८५० रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. या अंतर्गत ४८५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील ३२ लाभार्थ्यांनी पिकोफाॅल मशीनचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेच नव्हते. तरीही त्यांना जि.प.च्या वतीने लाभ देण्यात आला. त्यामुळे या साहित्याची २ लाख २४ हजार ३२० रुपयांची रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, अशी सूचना लेखा परीक्षण अहवालात करण्यात आली आहे. याशिवाय ४८५ लाभार्थ्यांची निवड करताना पंचायत समिती स्तरावर दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी गटविकास अधिकारी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी केली नसल्याचे समोर आले. पालम पंचायत समितीला ११ दिवस उशिराने पिकोफाॅल मशीन प्राप्त होऊन पं.स.ने जुन्या तारखेत या मशीन मिळाल्याची नोंद घेतली. ही गंभीर बाब असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच जि.प.च्या स्वउत्पन्नातील २० टक्के राखीव निधीमधून मागासवर्गीयांना सेवई मशीन पुरविण्यासाठी २९ लाख ८० हजार ७७० रुपयांचा खर्च करण्यात आला. या अंतर्गत ५४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील २८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव परिपूर्ण नसतानाही त्यांना लाभ देण्यात आला. त्यामुळे या संदर्भातील ५ लाख ४१ हजार ९४० रुपयांची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. शिवाय ज्या पुरवठादारांकडून या मशीन खरेदी केल्या, त्या पुरवठादाराने जि.प.ला ९० हजारांचा एफडीआर धनादेश दिला असताना तो जि.प.च्या खात्यावर जमा न करता तसाच ठेवून संबंधितास लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न जि. प. कर्मचाऱ्याने केल्याचे अहवालात नमूद केले आहे.

मिरची कांडप मशीन वाटपातही गडबड

स्वउत्पन्नातील २० टक्के निधीतील मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप यंत्र वाटप करण्यासाठी १९ लाख ९९ हजार ९९९ रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. त्यातून १५४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील १६८ लाभार्थ्यांच्या अर्जावर गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या, तर १८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव नसतानाही त्यांना मशीन वाटप करण्यात आले. त्यामुळे संबंधितांकडून २ लाख ६० हजार ८७४ रुपयांची रक्कम वसूल करण्याचे जि.प.ला सुचविण्यात आले आहे. या तिन्ही योजनांतर्गत नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविली गेली, असेही ताशेरे लेखापरीक्षणात ओढण्यात आले आहेत.