शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टर देतात अ‍ॅलियोपॅथीची औषधी ; जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:31 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून बाह्य रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना अ‍ॅलियोपॅथीच्या औषधी दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

- विजय चोरडिया 

जिंतूर ( परभणी ) : येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून बाह्य रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना अ‍ॅलियोपॅथीच्या औषधी दिली जात असल्याचा प्रकार समोर आला असून रुग्णांच्या जिवाशी खेळल्या जाणाऱ्या या प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासन मात्र काडीमात्र गंभीर नाही.

जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयास ट्रॉमाकेअरही जोडलेली आहे. रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी येथे तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख राज्य मार्गावरील या रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयातून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळणे आवश्यक असताना गेल्या काही दिवसांपासून येथील व्यवस्थापन कोलमडल्याने रुग्ण सेवेचा बोजवारा उडाला आहे.

रुग्णालयात अ‍ॅलोपॅथीचे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने त्यांच्याकडूनच दैनंदिन रुग्णांची तपासणे गरजेचे असताना आयुर्वेदिक व होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे.  व याच तीन विभागाच्या डॉक्टरांकडून अधिकार नसताना अ‍ॅलियोपॅथीची औषधी लिहून दिली जात आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विभागातील डॉक्टर हे कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीला आहेत. हद्द म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही अनेकदा नियमित रुग्णांची तपासणी (ओपीडी) केली जात आहे.

हा प्रकार  बिनबोभाटपणे अनेक दिवसांपासून सुरू आहे. याशिवाय येथील नेत्र तपासणीसाठी असलेले नेत्र सहाय्यकेही सोयीनुसार सेवा देतात. रुग्णांनी विचारपूस केल्यास आपणाकडे इतर ठिकाणचा पदभार असल्याने वेळ देता येत नाही, अशी उत्तरे त्यांच्याकडून दिली जातात. त्यामुळे नाइलाजाने अनेक रुग्णांना खाजगी सेवाच घ्यावी लागत आहे.  

ट्रॉमाकेअरचे ग्रामीण रुग्णालयावर अतिक्रमणजिंतूर येथे ट्रॉमाकेअर व ग्रामीण रुग्णालय या स्वतंत्र यंत्रणा आहेत; परंतु, अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामीण रुग्णालयातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर ट्रॉमाकेअरमध्ये सेवा देतात. येथे रुग्ण संख्या  कमी असते व सोयीनुसार सेवा देता येते. ट्रॉमाकेअरमध्ये निश्चित डॉक्टरांची नियुक्ती असतानाही ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना ट्रॉमा केअरमध्ये ड्युटी दिली जाते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण तपासणीवर परिणाम होत आहे. 

अधिकारी कर्मचाऱ्यांचीही मनमानी या रुग्णालयात एकीकडे अपुरा कर्मचारी वर्ग असताना येथील लिपिक गिरीश देशमुख सहा महिन्यांपासून गैरहजर आहेत. तर दुसरे लिपिक शेख हे १० महिन्यांपासून वरिष्ठांची मर्जी सांभाळून परभणी येथे संलग्न झाले आहेत. या शिवाय डॉ. सोळंके यांनी जिंतूर येथील पदभार घेतला; परंतु, चार महिन्यांपासून ते गैरहजर आहेत. या सर्व प्रकारावर वरिष्ठांकडून कारवाई होण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात आहे.

आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊ ग्रामीण रुग्णालयाच्या अडचणी संदर्भात आपण आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी सोडविण्यासंदर्भात प्रयत्न करू .- आ. विजय भांबळे , जिंतूर

गरजेनुसार काम करावे लागते नियमित रुग्णांची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांऐेवजी युनानी, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांचा वापर सर्वत्र होतो. यात विशेष काही नाही. यांना ओलिओपॅथीची औषधी देता येत नाहीत. मात्र गरजेनुसार काम चालवावे लागते. -डॉ. रविकिरण चांडगे, वैद्यकीय अधीक्षक 

नियमाबाह्य आहेडॉक्टरांनी ज्या पॅथीचे शिक्षण घेतले, त्याच पॅथीची प्रॅक्टीस केली पाहिजे. कारण, त्या पॅथीचे त्यांना संपूर्ण ज्ञान असते. मात्र शिक्षण एका पॅथीचे आणि उपचार दुसऱ्या पॅथीतून दिले जात असतील तर ते नियमबाह्यच ठरते. आमचा सुरुवातीपासूनच क्रॉस पॅथी उपचार पद्धतीला विरोध आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये जर असा प्रकार होत असेल तर तो नियमाबाह्यच आहे. -डॉ.राजू सुरवसे, अध्यक्ष, आय.एम.ए.

टॅग्स :Parabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीdoctorडॉक्टरmedicineऔषधं