महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळाने मानवत तालुक्यातील कोथळा, राजुरा, पारडी, शेवडी, नरळद, आटोळा, सोमठाणा आदी गावात लोककला, लोकनाट्य आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यात कोरोना लसीकरण, नदीप्रदूषण, स्वच्छता आदी विषयांचा समावेश होता. पंढरीनाथ बोडखे, शाहीर सुभाष पांचाळ, बाबासाहेब खूपसेकर, सोपान महाराज भोसले, बाळासाहेब कानडे, बालाजी वाडेकर, श्रीकांत कुलकर्णी, सय्यद इम्रान, संजय पांडे, सोनाली खराबे, आबासाहेब तिडके, भास्कर डासाळकर, मारुतीबुवा वाघ, गणेश कोइते, रामकृष्ण बोडखे, बालाजी खराबे, अनंतराव खराबे, काशिनाथ खराबे, अनिल पांडे, अंजली कुलकर्णी, प्रसाद देशपांडे आदी कलावंतांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे राजीव गांधी युवा फोरम या संस्थेने सेलू तालुक्यातील नागठाणा, कुंभारी, तळतुंबा, पिंपरी, खादगाव, जवळा जीवाजी आदी गावांत जनजागृती केली आहे.
मानवत, सेलू तालुक्यात पथनाट्याद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST