शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या प्रश्नांवर जागरूक आघाडी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST

परभणी : शहरवासीयांच्या विविध समस्यांवर जागरूक नागरिक आघाडीने १७ ऑगस्ट रोजी येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. ...

परभणी : शहरवासीयांच्या विविध समस्यांवर जागरूक नागरिक आघाडीने १७ ऑगस्ट रोजी येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. सिग्नल, पथदिवे यासह शहरातील विविध प्रश्न या आंदोलनातून मांडण्यात आले.

शहरवासीयांच्या प्रश्‍नावर जागरूक नागरिक आघाडी स्थापन करण्यात आली आहे. विविध प्रश्नांना घेऊन नागरिक आघाडी आंदोलन करीत आहे. मंगळवारी शहरातील रस्ते, वीज, पाणी यांसह इतर अनेक समस्या घेऊन जागरूक नागरिक आघाडीने आंदोलन केले. या समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आघाडीच्या ॲड. माधुरी क्षीरसागर, सुभाष बाकळे, संतोष आसेगावकर, ॲड. लक्ष्मण काळे, प्रभावती अन्नापुरे यांच्यासह नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

काय आहेत मागण्या

महात्मा फुले पुतळ्याजवळील चौकाचे सुशोभिकरण करावे व तेथे हायमास्ट लाइट बसवावा, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत या ठिकाणी वाहनांची गर्दी होत आहे तेथे सिग्नल व्यवस्था सुरू करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सिग्नल व्यवस्था सुरू करावी, भारतनगर विसावा कॉर्नर ते दत्तधामपर्यंत तसेच जाळीचा महादेव ते गंगाखेडरोड या मार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू करावी, अंत्यसंस्कारासाठी गॅस वाहिनीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे त्याची अंमलबजावणी करावी, स्ट्रीट लाइटचे कंत्राट ज्या एजन्सीला महापालिकेने दिले आहे, त्यांना सर्व स्ट्रीट लाइट सुरू करण्याचे आदेश द्यावेत, शिवाजी पार्कातील नाना-नानी पार्क उद्यानाच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला होता, अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. तेव्हा या कामाची चौकशी करावी व कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.