शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

एटीएसने परभणीतून आणखी एका युवकास उचलले

By admin | Updated: July 24, 2016 13:16 IST

एटीएसने शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एका युवकास ताब्यात घेतले.

ऑनलाइन लोकमत 

परभणी, दि. २४ - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एका युवकास ताब्यात घेतले असून, या युवकांकडून एक किलो स्फोटके व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.  एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईस दुजोराही दिला आहे़. विशेष म्हणजे मागील आठवड्यातच परभणी शहरातून एका युवकाविरूद्ध या पथकाने कारवाई केली होती़
आठ दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी परभणी शहरात पाळत ठेवून होते़ काही जणांवर या पथकाला संशय होता. याच संशयातून २३ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातून एका युवकाला या पथकाने ताब्यात घेतले आहे़ सदर युवकाकडून एक किलो वजनाच्या स्फोटक साहित्यासह आणखी काही संशयास्पद वस्तूही जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची कारवाई केल्याच्या वृत्ताला या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे़ परंतु, ज्या युवकाला ताब्यात घेतले त्या युवकाचे नाव अधिकृरित्या पथकातील अधिकाऱ्यानी जाहीर केले नाही . 
यापूर्वी १३ जुलै रोजी शहरातील गाडीवान मोहल्ला येथील नासेर खान या युवकाविरूद्ध दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून मुंबईत गुन्हा दाखल झाला होता़. त्यानंतर एका आठवड्यातच परभणी शहरातून दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका युवकाला ताब्यात घेतले आहे.