शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आणखी एक झाड कोसळले; स्टेशन रोडवर वाहतूक ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 11:46 IST

मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्दे शुक्रवारी मध्यरात्री शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामुळे स्टेशनरोडवरील वडाचे झाड रस्त्यावर आडवे झाले.

परभणी : येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालय जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी  १०  वाजेपर्यंत खोळंबली होती.

येथील रेल्वेस्थानक परिसरामध्ये वस्तू आणि सेवा कर कार्यालय असून, या कार्यालयाच्या संरक्षक भिंत जवळील वडाची जुनी झाड आहेत. शुक्रवारी मध्यरात्री शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामुळे स्टेशनरोडवरील वडाचे झाड रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आडवे झालेले झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले होते. साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जुने झाड पडल्याने झाडांच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील जायकवाडी भागात एक झाड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर स्टेशन रोड भागात झाड  पडल्याची घटना घडली.

परभणीत जायकवाडी समोरील रस्त्यावर कोसळले झाड; महिला बालंबाल बचावली 

परभणी जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्याला १ कोटी १९ लाख झाडे  लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकीकडे पावसाअभावी वृक्षारोपण मोहिमेत अडथळे निर्माण होत असताना दुसरीकडे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची जुनी झाडे जमीनदोस्त होत असल्याने जिल्हावासीयांना समोर ही एक नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता वृक्षारोपणा बरोबरच जुन्या झाडांचे संवर्धन करण्याकडेही प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्गParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका