शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

... अन् परभणीत दूध संकलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:06 IST

येथील एमआयडीसी परिसरातील शासकीय दूध डेअरीवर मागील काही दिवसांपासून ठप्प पडलेले दूध संकलन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नानंतर शनिवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील एमआयडीसी परिसरातील शासकीय दूध डेअरीवर मागील काही दिवसांपासून ठप्प पडलेले दूध संकलन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नानंतर शनिवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला़येथील शासकीय दूध डेअरीमध्ये ५० सहकारी संस्थांच्या माध्यमातून दररोज सुमारे ४५ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते़ गेल्या काही महिन्यांपासून वीज, पाणी आणि डिझेलसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने येथील दूध संकलन बंद करण्यात आले़त्यामुळे परभणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ५ जानेवारी रोजी आ़ डॉ़ राहुल पाटील यांना या संदर्भात माहिती दिली़ त्यानंतर तक्रारकर्त्या शेतकºयांसह आ़ डॉ़ राहुल पाटील व शिवसेना पदाधिकाºयांनी शासकीय दूध डेअरीमध्ये जाऊन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांना या प्रकरणी जाब विचारला़ मागील काही महिन्यांपासून वीज बिलाचे ५ लाख रुपये आणि डिझेल बिलाचे साडेचार लाख रुपये शासनाकडून मिळाले नसल्याने दूध संकलन बंद असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले़ यावर डॉ़ पाटील यांनी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संपर्क साधला़या प्रश्नावर राज्यमंत्री खोतकर, आ.डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ८ जानेवारी रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन खोतकर यांनी दिले़ मात्र तोपर्यंत परभणी येथील दूध संकलन सुरू ठेवण्याचे आदेशही दिले. त्यामुळे या डेअरीमध्ये दूध संकलनास सुरुवात झाली आहे़या प्रसंगी गंगाप्रसाद आणेराव, नंदू पाटील, संदीप झाडे, फैजुल्ला पठाण, सरपंच गोपीनाथ झाडे, शिवाजीराव चोपडे, दामोदर सानप, बाळासाहेब डुकरे, गजानन चट्टे, सुभाष जोंधळे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूधMIDCएमआयडीसी