परभणी - पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहार जनशक्ती पक्षाच्या संगीताताई विजय पवार व उपसरपंचपदी अनिल भीमराव राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
एकूण ७ सदस्य असलेल्या आनंदनगर तांडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवराज राठोड यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पॅनलने ७ पैकी ५ जागांवर विजय मिळवून निर्विवाद बहुमत सिद्ध केले होते. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीताताई पवार तर उपसरपंचपदी अनिल राठोड यांची निवड झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते नवनियुक्त सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद आलू पवार, तालुकाप्रमुख नारायण ढगे, पाथरी तालुकाप्रमुख युवराज राठोड, परभणी शहरप्रमुख पिंटू कदम, अनिल पवार, बाळू नरवाडे, देविदास पवार, सोमनाथ पवार, बाबूराव पवार, धनसिंग पवार, सूर्यकांत राठोड, दत्ता पवार, भारत पवार, नारायण राठोड, कोंडिराम राठोड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.