शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात देऊळगावनंतर आता देवठाणा परिसरात बिबट्याची धास्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 15:15 IST

शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर आता देवठाणा येथेही असा हल्ला झाला.

पूर्णा (परभणी) : तालुक्यातील शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर आता  देवठाणा येथेही काल रात्री हिंस्त्र पशूने गायीच्या बछड्यावर हल्ला चढवत फडशा पाडला. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

मागील ५ दिवसांमध्ये तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर, देऊळगाव दुधाटे येथे शेतातील जनावरांवर हल्ला झाला होता. तसेच या भागात बिबट्या सदृश्य प्राण्याचे वास्तव असल्याच्या खुणा आढळून आल्या. यानंतर सोमवारी रात्री देवठाणा येथे पिराजी जोगदंड यांच्या शेतातील गायीच्या पिल्लावर हिंस्र पशु कडून प्राणघातक हल्ला झाला. या परिसरातील आठवड्याभरात ही तिसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती आहे. 

देऊळगावात बिबट्यानसून तरस दरम्यान या तिन्ही घटनांचे परभणी वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. यानंतर वन विभागाने पिंपळगाव व देऊळगाव येथे हल्ला करणारा पशु वाघ किंवा बिबट्या नसून तरस असल्याचा निर्वाळा दिला. तसेच आज सकाळी देवठाणा येथे वनपाल चंद्रा मोघे यांच्या पथकाने सकाळी भेट देऊन पुरावे जमा केले आहेत. यासोबतच वन विभागाकडून या परिसरात झालेले हल्ले तरस या प्राण्याने केले आहेत, तो लहान प्राण्यावर हल्ला करू शकतो असे सांगण्यात येत आहे. तरीही या प्राण्याची या भागातील प्रमाण किती आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. 

ग्रामस्थांनी काळजी घ्यावी गाईच्या कारवडीवर हल्ला करणारा हिंस्त्र पशु हा बिबट्या असू शकतो. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी शेती आखाड्यावर थांबू नये तसेच सुरक्षतेसाठी शेकोटीचा वापर करावा.- डी.के.डाखोरे, वन परिक्षेत्र अधिकारी, परभणी

टॅग्स :leopardबिबट्याparabhaniपरभणी