शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा रुग्णालयात १२ वर्षानंतर सुरू झाला स्त्री रुग्ण विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 19:06 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल १२ वर्षानंतर स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, या विभागात सद्यस्थितीत २४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळाला आहे़ ‘लोकमत’च्या दणक्यानंतर प्रशासनाने हा विभाग सुरू केला आहे़ 

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल १२ वर्षानंतर स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, या विभागात सद्यस्थितीत २४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळाला आहे़ ‘लोकमत’च्या दणक्यानंतर प्रशासनाने हा विभाग सुरू केला आहे़ 

परभणी येथे २००५ मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ़ विमल मुंदडा यांनी स्वतंत्र स्त्री रुग्णालयास मंजुरी दिली होती़ त्यानंतर २००६ मध्ये ६० बेडचे स्त्री रुग्णालय जागेअभावी जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभागात तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आले होते़ त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर असलेला स्त्री रुग्ण विभाग सुरूच केला नव्हता़ तब्बल १२ वर्षे हा प्रकार सुरू होता़ ६ ते ८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत केंद्र शासनाच्या सीआरएम पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला़ ७० बेडचा रुग्ण विभाग बंद करून त्या जागेत ६० बेडचे स्त्री रुग्णालय सुरू केल्याच्या या प्रकाराविषयी सीआरएम पथकाने शासनाला सादर केलेल्या अहवालात ताशेरे ओढले होते़ या संदर्भातील माहिती ‘लोकमत’ला मिळाल्यानंतर १० मार्च २०१८ च्या अंकात ‘स्त्री रुग्ण विभाग १२ वर्षांपासून गायब’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़ त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनात खळबळ उडाली़ या विषयी अनेकांनी संताप व्यक्त करून या संपूर्ण कालावधीत जिल्हा रुग्णालयात ज्यांनी ज्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचा पदभार स्वीकारला, त्या सर्व अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती़ 

‘लोकमत’च्या वृत्तानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने १२ वर्षांपूर्वी बंद केलेला स्त्री रुग्ण विभाग पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू केल्या़ त्यानंतर दोन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअरच्या इमारतीमध्ये २४ खाटांचा स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे येथे महिला आता उपचार घेऊ लागल्या आहेत़ या संदर्भात २२ मार्च रोजी सदर प्रतिनिधीने रुग्णालयात पाहणी केली असता, येथील कर्मचारी व रुग्णांनी ‘लोकमत’चे आभार व्यक्त केले़ आता स्त्री रुग्ण विभागाचा स्वतंत्र ७० खाटांचा विभाग सुरू करावा, जेणे करून जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी येणार्‍या महिला रुग्णांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी केली जात आहे़ 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलparabhaniपरभणीdoctorडॉक्टरmedicineऔषधं