शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात प्रशासनाची मदत कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:21 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत देण्याच्या उद्देशाने अहवालही तयार केला; परंतु, प्रशासनाचा हा ‘मायेचा ओलावा’ कोरडाच ठरला असून दोन महिन्यानंतरही एकाही कुटुंबियांना मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाची मदत कागदावरच राहते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.

विठ्ठल भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत देण्याच्या उद्देशाने अहवालही तयार केला; परंतु, प्रशासनाचा हा ‘मायेचा ओलावा’ कोरडाच ठरला असून दोन महिन्यानंतरही एकाही कुटुंबियांना मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाची मदत कागदावरच राहते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.२०१२ ते २०१७ या कालावधीत आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार १८ नोव्हेंबर २०१७ रोजी या शेतकरी कुटुंबियांचे सर्र्वेक्षण करण्यात आले. एक प्रश्नावली तयार करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची आर्थिक स्थिती, त्यांचे उत्पन्नाचे साधन याविषयीची माहिती एकत्रित करुन या कुटुंबियांना प्रशासकीय स्तरावरुन काय मदत केली जाऊ शकते, याचा अंदाज घेण्यात आला. शेतकरी कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना प्राधान्यक्रमाने शासकीय योजनांचा लाभ देण्याचेही निश्चित करण्यात आले.पाथरी तालुक्यात पाच वर्षात ५० शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल महसूल यंत्रणेकडे प्राप्त झाला. या अहवालाआधारे शासनाच्या १८ योजनांसाठी लाभार्थी म्हणून कुटुंबियांची निवडही करण्यात आली. शासन निकषानुसार या कुटुंबियांना तत्काळ लाभ देऊन कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांची निवड करुन ती यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली.या सर्वेक्षणाला आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रत्यक्षात एकाही कुटुंबियांपर्यत लाभ पोहोचला नाही. त्यामुळे हे लाभ केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा कुटुंबियांना लागली आहे.महसूल विभागाने त्यांच्या अख्त्यारितील राष्ट्रीय अन्न सुरक्षा व निराधारांचे अनुदान या दोन मुद्यांवर लाभार्थ्यांची निवड केली. मात्र त्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी सहानुभूतीच्या भावनेतून प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले खरे; परंतु त्यानंतर मदतीसाठी मात्र आखडता हात घेतल्याने प्रशासनाची ही सहानुभूती केवळ कागदोपत्रीच आहे की काय, अशी भावना शेतकरी कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या तरी शेतकरी कुटुंबिय शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचेच दिसून येत आहे.१८ योजनांच्या याद्या तयारआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या सर्व्हेक्षणानंतर १८ योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कौशल्य विकास, आरोग्य, कर्ज, वैरण विकास, शेतीसाठी वीज, घरगुती वीज जोडणी, सिंचन विहीर, शेततळे, गॅस जोडणी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, हॉस्टेल सुविधा, शौचालय, घरकुल, जनधन, कुटुंब अर्थसहाय्य, निराधार योजना आदी योजनांचा समावेश आहे.पंचायत समितीस्तरावरुन प्रस्तावांची मागणीआत्महत्याग्रस्त कुटुंबियांना लाभ देण्यासाठी पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरीसाठी ४१, वैयक्तिक शौचालयासाठी २७, घरकुलासाठी ३९ लाभार्थ्यांनी मागणी केली असून एकाही कुटुंबाला अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही. या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने पंचायत समितींना सादर करावेत, असे आदेश गटविकास अधिकाºयांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.